आत्मसन्मानासाठी शिक्षकांची भव्य रॅली : भर पावसात लाखो शिक्षकांचा सहभाग !

शालेयवृत्त सेवा
0

 




 शिक्षक आमदाराच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांना दिले निवेदन !


औरंगाबाद ( शालेय वृत्तसेवा ) :

शिक्षकांना मुक्त वातावरणात शिकूवू द्या ,मुलांची गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांकडील  अशैक्षणिक कामे कमी करा अशी मागणी करत शिक्षक आमदारांनी सरकारवर तोफ डागली. भर पावसात शिक्षक सन्मान रॅलीत राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लाखो शिक्षकासह शिक्षक पदवीधर आमदार एकवटले होते .



जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या मुख्यालय वास्तव्याचा संदर्भ शैक्षणिक गुणवत्तेशी जोडून शिक्षकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न काही घटकांकडून होत आहे. या अपप्रचारामुळे शिक्षक अस्वस्थ आहेत वंचित समाज घटकासाठी प्रतिकूल परिस्थितीतही उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकाविरुद्ध गैरसमज निर्माण केले जात आहे म्हणून शिक्षकांच्या आत्मसन्मानाच्या लढ्याला समर्थन देण्यासाठी आणि शिक्षण विषयक मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हमखास मैदान ते विभागीय आयुक्त कार्यालय असे शिक्षक सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.



या रॅलीत शिक्षक भारती सह शिक्षक सेना, जुनी पेन्शन हक्क संघटना, दिव्यांग कर्मचारी संघटना, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना, उर्दू शिक्षक संघटना, मुप्टा शिक्षक, संघटना पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद, प्रहार शिक्षक संघटना, महाराष्ट्र शिक्षक संघटना, प्राथमिक शिक्षक संघ आदी संघटना सहभागी झाल्या होत्या. सन्मान रॅलीच्या माध्यमातून आयुक्तांना निवेदन देण्यात आले यावेळी विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनीही फोनवरून शिक्षकांशी संवाद साधला.



"शिक्षकांनी अपडाऊन केले तर बिघडले कुठे ? मुंबई उच्च न्यायालयात देखील मुख्यालय राहण्याची याचिका फेटाळली  होती.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना त्यांना मान्य नाही .घटनेला थेट विरोध करता येत नाही म्हणून ग्रामविकासाच्या नावाखाली शिक्षकांना बदनाम करून शिक्षणाच्या खाजगीकरणाचा घाट घातला जात आहे .आमदार बंब हे प्यादे आहेत बोलविता धनी   दुसराच आहे प्रशांत भाऊ यांनी  स्वतःच्या मतदारसंघाकडे पहावं, जिल्हा परिषद शाळांचे खाजगीकरण करण्यासाठी हा सगळा घाट सुरू आहे.

- आमदार कपिल पाटील 



"शिक्षकांना कोणी विचारले तुम्ही कुठे राहता तर आम्ही गावात राहतो असे सांगा .गावातील सरपंच पालक नागरिक यांना विनम्र  बोला ,सन्मानाने वागणूक द्या.  जिल्हा परिषदेच्या शाळेत गुणवत्ता नाही असे म्हणणाऱ्यांनी लक्ष्यात घ्यावे की 75 हजार विद्यार्थी हे सरकारी शाळेत आले आहेत. शिवाय स्पर्धा परीक्षेचा आढावा घेतला तर याच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी यात अधिक उत्तीर्ण झाले आहेत .विनाकारण शिक्षकांना बदनाम करू नका आमदार बंब यांनी आरोप न करता स्वतःच्या मतदारसंघातील शाळा आदर्श कराव्यात. 

- आमदार विक्रम काळे



"बहुतांश शिक्षक चांगले काम करत आहेत असे असताना त्यांच्याबद्दल नकारात्मक वातावरण निर्मिती करणाऱ्यांचा मी निषेध करतो .असे होत असताना शासन गप्प का ?मुख्यमंत्र्यांनी यावर भूमिका जाहीर करावी यावर चुप्पी साधने म्हणजे दुटप्पेपणा आहे. 

- आमदार सुधीर तांबे

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)