विद्यार्थ्याच्या वैज्ञानिक प्रतिभेला वाव देण्यासाठी विज्ञान प्रदर्शन एक प्रभावी माध्यम - सीईओ वर्षा ठाकूर-घुगे | Science Exhibition

शालेयवृत्त सेवा
0

 


सीईओ वर्षा ठाकुर- घुगे यांच्या हस्ते झाले जिल्हा विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन !


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

प्रकल्पाच्या उभारणीसाठी विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न व कुतूहल निर्माण झाले पाहिजेत कारण कुतूहलच विज्ञानाला जन्म देत असते विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेला वाव देण्यासाठी तसेच वैज्ञानिक कुतूहल जोपासण्यासाठी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन एक प्रभावी माध्यम आहे असे मत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी व्यक्त केले.



ग्रामीण टेक्निकल कॅम्पस मध्ये जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी बंगरूळचे सह संस्थापक रुपेश किनीकर माध्यमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर प्राथमिकचे शिक्षणाधिकारी डॉक्टर सविता बिर्गे उपशिक्षणाधिकारी माधव सलगर उपशिक्षणाधिकारी बंडू अंदुरकर उपस्थित होते .


प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक प्रतिभा असते विद्यार्थ्यांमधील प्रतिभेला वाव देण्यासाठी विज्ञान शिक्षकाने विद्यार्थ्यांमध्ये धाडस आत्मविश्वास व सातत्य हे ती स्त्री सूत्रे रुजवावे असे सीईओ ठाकूर यांनी यावेळी सांगितले विज्ञान प्रदर्शनातून मांडलेल्या प्रयोगातून समाज उपयोगी प्रकल्पाची उभारणी व्हावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केले .


प्रदर्शनात स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी मांडलेल्या ॲपचे व प्रकल्पाचे त्यांनी कौतुक केले तसेच समाज माध्यमावर वेळ वाया न घालवता वैज्ञानिक प्रकल्पाची निर्मिती करावी असे आवाहनही सीईओ ठाकूर यांनी केले यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉक्टर विजय पवार डॉक्टर ओमप्रकाश दरक प्रलोभ कुलकर्णी सहायक शिक्षण उपनिरीक्षक हनुमंत पोकले ग्रामीण कॅम्पचे सुधीर शिंदे आदींनी पुढाकार घेतला जवळपास 26 परीक्षकाने परीक्षेचे काम बघितले.



 प्रकल्पाची मांडणी :

प्रदर्शनातून प्राथमिक गटातून 48 माध्यमिक 48 आदिवासी आठ व शिक्षकांचे दहा प्रकल्प अशी प्रकल्पाचे मांडणी करण्यात आले यात उमेश सिक्युरिटी ॲप हायड्रोजन जनरेटर गणितीय मॉडेल वीज निर्मिती व पाणी उपसा यंत्र संचलित उपसा जल यंत्र कोरोना व्हायरस मॉडेल हायड्रोपोनिक पावर स्वयंचलित पाणी मोटार नियंत्रक हे प्रकल्प आकर्षणाचे केंद्र ठरले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)