खासदार डॉ. हिनाताई गावीत यांच्या हस्ते प्रहार संघटनेचे जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

शालेयवृत्त सेवा
0

 



नंदुरबार (शालेय वृत्तसेवा) :

हिरा इक्झिक्युटिव  नंदुरबार येथे महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटना नंदुरबार जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार नंदुरबारचे लोकप्रिय खासदार संसदरत्न मा.डॉ. हिनाताई गावीत यांच्या शुभ हस्ते पुरस्कार शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आला. 


यावेळी जिल्हा परिषदेचे शिक्षण विभाग प्राथमिक उपशिक्षणाधिकारी डॉ. यूनुस पठाण, नंदुरबार शहर नगरसेवक गौरव चौधरी, प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत, जिल्हा मार्गदर्शक संजय गावीत, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास देसाई, जिल्हा संघटक गणेश पाटील, जिल्हा महिला आघाडी प्रमुख रूपाली पाटील, कोषाध्यक्ष निदेश वळवी, प्रसिद्धी प्रमुख धरमदास गावीत, महिला संघटक रंजना साबळे, मिनाक्षी वसावे, प्रमिला कोकणी आदी उपस्थित होते. 



प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार नावे- कुमुदिनी फुलसिंग वसावे जि.प.शाळा अंजने ता. नवापूर, चेतन मधुकर शिंदे जि.प.शाळा कलमाडी त.बो. शहादा, सुनिल शिवलाल चित्ते जि.प.प्रा.शाळा टेंभे त .सा.शहादा, सुनंदा नामदेवराव निकवाडे जि.प.शाळा जुने धडगाव ता.धडगाव, प्रकाश नामदेव माळी जि.प. शाळा खामचौंदर ता. नवापूर, केश्वर तुकाराम वसावे जि.प.शाळा बरडी ता अक्कलकुवा, कु. रंजीना हुन्या गावीत जि.प.शाळा भादवड ता. नवापूर, सुनिल नारायण सोनवणे जि.प.शाळा शेगवे ता . नवापूर, दयानंद विश्वभर जाधव जि.प. शाळा वरूळ ता. जि. नंदुरबार, मांगूबाई दाज्या गावीत जि.प. शाळा खोकसा नवापूर, दिपक भास्कर पाटील जि.प. शाळा तुळाजे ता. तळोदा, विजय जयसिंग कामडे जि.प.प्रा.शाल चिखलटीपाडा ता . धडगाव, कैलास प्रल्हाद साळवे जि.प. शाळा नवे धडगाव ता . धडगाव या शिक्षकांचा गुण गौरव करण्यात आला. 



यानंतर खासदार हिनाताई गावित यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, ग्रामीण भागातील वाडी, वस्ती, पाड्यातील शाळाबाह्य विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शाळेत दाखल झालेली विद्यार्थी शाळेत टिकली पाहिजे व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी तंत्रज्ञानाचा वापर करून दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करावा. प्राथमिक शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहू असा विश्वास दिला. प्राथमिक उपशिक्षणाधिकारी डॉ. युनुस पठाण यांनी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे.या कार्याबद्दल कौतुक केले. 



तसेच आदिवासी विकास मंत्री ना.डाॅ. विजयकुमार गावीत, मा.आमदार शिरीषदादा चौधरी यांनी नियोजित कार्यक्रमात व्यस्त असल्याने प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत यांनी संघटनेचे प्रेरणादायी प्रवासाचा उल्लेख करुन केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आढावा दिला. पुरस्कार प्राप्त शिक्षक सुनील चित्ते यांनीही शाळास्तरावर केलेल्या उपक्रमाचे सादरीकरण केले. प्रसिद्धीप्रमुख धरमदास गावीत यांनी रेखाटलेल्या आकर्षक रांगोळीचे प्रमुख पाहुणे यांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कमलेश पाटील यांनी केले व उपस्थित शिक्षकांचे आभार जिल्हा संघटक गणेश पाटील यांनी मानले.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)