शिक्षक दिनी आमदार मा.प्रशांत बंब यांच्या वक्तव्याचा निषेधार्थ नांदेड जिल्ह्यातील शिक्षकांनी काळ्या फिती लावून केला निषेध !

शालेयवृत्त सेवा
0

  


नांदेड जिल्ह्यातील सर्वच शिक्षक आणि सर्वच शिक्षक संघटनांचा पुढाकार !


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

५ सप्टेंबर शिक्षकदिनी नांदेड जिल्हयातील सर्वच शिक्षक संघटनांच्या वतीने गंगापूर, औरंगाबादचे भाजपा आमदार मा.प्रशांत बंब यांनी जिल्हा परिषद शाळा व शिक्षकांबद्दल पूर्वग्रहदुषित भावनेतून वस्तूस्थितीचा विपर्यास करून एकतर्फी, अतार्कीक, अर्थहिन असे जिल्हा परिषदेंच्या शाळां व शिक्षकांच्या बाबतीत केलेल्या बदनामीकारक वक्तव्याचा आज जिल्हाभर नांदेड जिल्हयातील सर्व शिक्षक व सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने शाळा शाळांत नांदेड जिल्हाभर काळ्या फिती लावून काम करत निषेध आंदोलन १००% यशस्वी झाले. 



काळ्या फिती लावून काम करणे निषेध आंदोलनाला नांदेड जिल्ह्यात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. पूर्वनियोजनानूसार सदर आंदोलनाचा ज्येष्ठागौरी सणामुळे संघटनेच्या प्रमुख पदाधिकार्यांच्या प्रातिनिधिक उपस्थितीत जिल्हा परिषद परिसरात आज जोरदार घोषणाबाजी करून आजच्या आंदोलनाचा समारोप करण्यात आला. 


यापूढे जिल्हा परिषद शाळां व शिक्षकांच्या अपमानास्पद वक्तव्य आल्यास पुढील आंदोलना संदर्भात लवकरात लवकर सर्व शिक्षक संघटनांची एका व्यापक बैठकीचे आयोजन करण्याचे ठरले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)