निळकंठ चोंडे यांच्या सेवापुर्ती निरोप समारंभ निमित्त शाळेला झेरॉक्स आणि प्रिंटर मशीन भेट..

शालेयवृत्त सेवा
0

 


        


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा निळा ता.जि. नांदेड येथील पदोन्नत मु.अ.श्री निळकंठ माधवराव चोंडे सर नियत वयोमानानुसार दिनांक 31 ऑगस्ट 2022 रोजी सेवानिवृत्त झाले,आणि त्या निमित्त महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ द्वारे आयोजित कार्यक्रम कुसुम सभागृह नांदेड येथे आयोजित करण्यात आला होता.

         

सत्कारमुर्ती आदरणीय चोंडे सर यांचा निरोप समारंभ चा कार्यक्रम मा.प्रा.मनोहर धोंडे साहेब संस्थापक अध्यक्ष शिवा अखिल भारतीय युवक संघटना यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.


सन्माननीय विद्यमान आमदार नांदेड उत्तर चे लोकप्रिय आमदार बालाजीराव कल्याणकर साहेब, सन्माननीय माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जिल्हा परिषद नांदेड च्या श्रीमती मंगारांणी आंबुलगेकर मॅडम,माजी आमदार सन्माननीय हरिहरराव भोशीकर, माजी शिक्षण सभापती जिल्हा परिषद नांदेड चे सन्माननीय संजय बेळगे साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य लोहगावे साहेब, माजी शिक्षण संचालक सन्माननीय श्री गोविंद नांदेडे साहेब, प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नांदेड च्या श्रीमती डॉ.सविता बिरगे मॅडम, माध्यमिक शिक्षणाधिकारी सन्माननीय श्री प्रशांतजी दिग्रस्कर साहेब, उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नांदे चे श्री बनसोड साहेब,राज्य सरचिटणीस महाराष्ट्र राज्य प्राथमिक संघ चे मा.श्री लायक पटेल, मा.शिक्षण विस्तार अधिकारी बीट निळा च्या श्रीमती लता कौठेकर मॅडम, केंद्रप्रमुख केंद्र निळा श्री विश्वभर संभाजीराव धोपटे सर,


स्वागताध्यक्ष श्री मधुकर उन्हाळे सर.केंद्र निळा अंतर्गत चे सर्व उच्चश्रेणी मुख्याध्यापक श्री गोवंदे आर.डी प्रा.शाळा तळणी श्री पडगिलवार एस.जी.प्रा. शाळा पुयनी श्री वाघमारे सर प्रा.शाळा पिंपरी श्री श्रीकांत कुलकर्णी सर प्रा.शाळा एकदरा श्रीमती वाटेगावकर मॅडम प्रा शाळा मरळक बु. मु.अ.श्री खाडे सर,राठोड सर, चिकाटे मॅडम,वळसंगीकर मॅडम, आंबटवाड मॅडम,यम्मलवाड सर, सावळे सर,पतंगे सर,कंधारे सर, सालेगाये सर,ढवळे सर,अनमोड सर,तलवाडे सर,फुलारी सर, निळा येथील व्यवस्थापन समिती अध्यक्ष सन्माननीय श्री शिवाजीराव भाऊराव जोगदंड,माजी अध्यक्ष श्यामसुंदर जोगदंड,नागरतन हिंगोले,माधव हिंगोले आणि त्यांचे कोमल आणि यश हिंगोले ही मुले,किशन जोगदंड,निळा येथील सेवानिवृत्त शिक्षक श्री शिवाजीराव जोगदंड. आणि श्री चोंडे सर यांचा चा पूर्ण परिवार,नातेवाईक,सर्वमित्रमंडळ,राजकीय पदाधिकारी, वेगवेगळ्या संघटनाचे अध्यक्ष, सदस्य,तसेच त्यांचे माजी विध्यार्थी,आणि मित्रपरिवार हजारो च्या संख्येने उपस्थित होता.


निळा केंद्राच्या वतीने पहिला सत्कार विस्तार अधिकारी श्रीमती लता कौठेकर मॅडम, केंद्राचे केंद्रप्रमुख श्री धोपटे सर आणि सर्व मुख्याध्यपक यांच्या हस्ते वॉटर फिल्टर ची भेट देण्यात आली. आणि जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा निळा च्या वतीने चोंडे सर आणि चोंडे ताई यांना कपडेरुपी आहेर आणि दोन समया केंद्रीय प्र.मुख्याध्यापक श्री पोहरे सर, श्री बेळगे सर, श्रीमती सुलभा पांडे मॅडम, श्रीमती विद्या गंजेवार मॅडम, श्रीमती पद्मिनी पाम्पटवार मॅडम,श्रीमती ज्योत्स्ना वाघमारे मॅडम,श्रीमती प्रणिता कर्णेवार मॅडम,श्रीमती सुलभा रत्नपारखी मॅडम,श्रीमती सुनीता मोखंडपल्ले मॅडम,यांच्या हस्ते चोंडे सरांचा आणि चोंडे ताईंचा यथोचित सन्मान करण्यात आला.


या कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे बहारदार आणि विस्तृत प्रास्ताविक श्री शंकर हासगुळे सर यांनी केले. या सेवापुर्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने मधुकर उन्हाळे सर,विठ्ठल ताकबीडे सर,हरिहर राव भोशीकर साहेब,लायक पटेल, डॉ.बिरगे मॅडम,दिग्रस्कर साहेब,लोहगावे साहेब, सर्व मान्यवर आणि वक्तागण यांनी आपल्या मनोगतातून यांनी चोंडे सर यांच्या कार्याचा गौरव केला.


तर त्यांची सुकन्या विद्या निळकंठ चोंडे यांनी ही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. सत्कारास उत्तर देताना श्री चोंडे सर यांनी आपण याच शिक्षक संघटनेत अखेरपर्यंत राहून शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी लढत राहीन अशी प्रतिक्रिया दिली.


याच सभागृहत नांदेड चे माजी गटशिक्षणाधिकारी साहेब श्री अशोक देवकरे साहेब यांचा 2019 ला मोठ्या प्रमाणात भव्यदिव्य निरोप समारंभ पार  पडला होता. त्या नंतर एका उच्चश्रेणी मुख्याध्यापकाचा निरोप समारंभ एव्हढ्या मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा आणि त्यास हजारोच्या संख्येने त्यांच्या चाहत्याची उपस्थिती लाभावी आणि तो कार्यक्रम शेवटपर्यंत सर्वांनी पाहावा यापेक्षा श्री चोंडे सर यांच्या गौरवाची पावती कोणती?

           

परत भेट म्हणून सेवानिवृत्त उच्चश्रेणी मुख्याध्यापक श्री चोंडे सर यांनी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा निळा ता.जि.नांदेड साठी अध्यक्षीय समारोप श्री प्रा.मनोहर धोंडे साहेब यांनी केला.राष्ट्रगीतांनंतर कार्यक्रम संपन्न झाला. भव्यदिव्य कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसन्नचलन आणि आभार प्रदर्शन श्री संजय कोथले सर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)