निळा केंद्राची केंद्रस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न..

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा निळा येथे जिल्हा परिषद,नांदेड व पंचायत समिती,नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय वर्षा ठाकूर ( मा.मु.का.अ नांदेड )यांच्या संकल्पनेतून व मा.ग.शि.अ . नागराज बनसोडे साहेब,शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती लता कौठेकर मॅडम आणि केंद्रप्रमुख श्री विश्वंभर धोपटे यांच्या मार्गदर्शनानुसार मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात येत असलेल्या केंद्रस्तरीय सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा केंद्र निळा तालुका नांदेड येथे  आयोजन करण्यात आले होते.


यात सहा शाळांचा सहभाग होता .जि.प.के.प्रा.शाळा निळा,  प्रा.शा.पुयनी,प्रा.शा. एकदरा,प्रा. शाळा पिंपरी,प्रा.शाळा मरळक बु.आणि लिंबगाव हायस्कूल या शाळांनी सहभाग घेतला.प्रत्येक शाळेतून दोन विध्यार्थी सहभागी झाले होते.


एकूण 6 राउंड घेण्यात आले. या प्रश्नमंजुषाचे उत्कृष्ट सादरीकरण सूत्रसंचालन श्री प्रमोद फुलारी सर मुख्याध्यापक प्रा.शा.धानोरा यांनी केले. तर गुणदर्शक फलक लेखन श्री संजय बेळगे प्रा.शिक्षक कें.प्रा.शाळा निळा यांनी केले.

         

या केंद्रस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रा.शाळा पुयनीने मिळवला.विजेत्या शाळेतील विद्यार्थ्यांचे पेन देऊन अभिनंदन आणि स्वागत श्री श्रीकांत कुलकर्णी सर यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख श्री विश्वंभर धोपटे यांनी केले.


अध्यक्षस्थानी श्री.पोहरे के.पी. केंद्रीय मु.अ.कें. प्रा.शा.निळा हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून केंद्राचे केंद्रप्रमुख श्री धोपटे व्ही. एस, प्रा.शाळा पुयनीचे पदोन्नत मुख्याध्यापक श्री पडगिलवार सर,प्रा.शाळा पिंपरी चे पदोन्नत मुख्याध्यापक श्री वाघमारे सर, प्रा.शाळा एकदरा चे पदोन्नत मुख्याध्यापक श्री कुलकर्णी सर,हे होते.या कार्यक्रमाचे आयोजन निळा केंद्राच्यावतीने करण्यात आले होते. विस्तृत आणि सर्व घटकांवर आधारित परिपूर्ण आणि वस्तुनिष्ठ  प्रश्नपपत्रिका स्वतः केंद्रप्रमुख श्री धोपटे सर यांनी काढली.

               

कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचलन श्री प्रमोद फुलारी सर यांनी केले,गुणदान श्री बेळगे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन आणि उत्कृष्ट चित्रीकरण श्री पतंगे सर यांनी केले. प्रा शाळा पुयनी च्या विध्यार्थ्यांना तालुकास्तरीय स्पर्धेसाठी सर्वांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)