आयसर पुणे , एम एस सी ई आर टी पुणे आणि डायट, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार येथे तीन दिवसीय विज्ञान आणि गणित कार्यशाळा संपन्न

शालेयवृत्त सेवा
0

 



नंदुरबार (शालेय वृत्तसेवा) :

शिक्षण आणि संशोधन संस्था, पुणे, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्ह्यातील शाळांमधील इनोव्हेशन कोचेस तयार करण्यासंदर्भात तीन दिवसीय विज्ञान आणि गणित कार्यशाळा नंदुरबार येथे यशस्वीरित्या संपन्न झाली . 


या कार्यशाळेचे प्रयोजन हे  (आयराईज) उपक्रमाअंतर्गत शिक्षकांना नवोपक्रम, शैक्षणिक आशय  ज्ञान आणि मूल्यमापन साधनांवर मार्गदर्शन करणे आहे. ह्या कार्यशाळेनंतर, शिक्षक शाळेतील मुलांमध्ये सर्जनशीलता, समस्या सोडवण्याचा नाविन्यपूर्ण दृष्टीकोन रुजवण्याचा प्रयत्न इनोवेशन  मॉडेल, प्रशिक्षण पद्धत, सत्राच्या संकल्पना, पद्धती आणि धोरणे यांच्या द्वारे करण्यात आले. 


विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकार, आयसर पुणे,ब्रिटिश कौन्सिल, रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री, टाटा टेक्नॉलॉजीज यांच्या संयुक्त विद्यमाने संचालित आयराईझ  टीचर डेव्हलमेंट प्रशिक्षणच्या तिसऱ्या टप्प्यातील तीन दिवसीय कॅस्केड प्रशिक्षण दि.१३ ते १५ सप्टेंबर, २०२२ दरम्यान जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, नंदुरबार येथे आयोजित करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणास सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी  नंदुरबार श्रीमती मीनल करणवाल  यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी प्रशिक्षणार्थी शिक्षकांशी संवाद साधला . 


सदर प्रशिक्षणातून आपण नेमके काय शिकलात याविषयी शिक्षकांशी संवाद केला तसेच आपल्या संवादातून श्रीमती मीनल करणवाल यांनी असे आवाहन केले की, शिक्षकांनी विद्यार्थी विकासासाठी नाविन्यपूर्ण विचारातून अध्ययन अध्यापन करणे आवश्यक असून उपलब्ध स्थानिक परिस्थितीतील साधनातून विज्ञान व इतर विषयांची संकल्पनात्मक दृष्टीने जोडणी करून अध्यापन करणे आवश्यक आहे. 


सदर प्रशिक्षणास डाएट प्राचार्य डॉ. जगराम  भटकर, आयसर पुणे चे सहाय्यक प्रकल्प संशोधक डॉ सौरभ दुबे, डायटचे वरिष्ठ अधिव्याख्याता  रमेश चौधरी, अधिव्याख्याता तथा प्रशिक्षण समन्वयक डॉ. राजेंद्र महाजन, अधिव्याख्याता डॉ.संदीप मुळे, पंढरीनाथ जाधव, सुभाष वसावे यांच्यासह आयसर प्रोग्राम ग्रुप, आयसर पुणे यांचा सहभाग लाभला. 


या कार्यशाळेचा जिल्ह्यातील ६८ गणित व विज्ञान शिक्षकांनी या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घेतला. सर्व सत्र इंनोव्हेशन चॅम्पिअन्स,. दत्तात्रय वाणी, राहुल साळुंखे, अनंतकुमार सूर्यवंशी तसेच iRISE टीम चे प्राध्यापक डॉ. सौरभ दुबे, आयसर पुणे च्या सहयोगी प्राध्यापक श्रीमती श्रद्धा भुरकुंडे, श्रीमती प्रज्ञा पुजारी, शुभम पाटील यांच्याद्वारे घेण्यात आले .या प्रशिक्षणात सर्व सहभागी शिक्षकांना गणित व विज्ञान शिकविण्यास उपयोगी अशा क्रियाकलापांसाठी उपयोगी असे साहित्य संच किट व प्रमाणपत्र देण्यात आले. प्रशिक्षण यशस्वीतेसाठी समन्वयक तथा अधिव्याख्याता डॉ. राजेंद्र महाजन व सहाय्यक शिक्षक गोविंद वाडीले यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)