नंदुरबार जिल्हास्तरीय ऑनलाईन विज्ञान प्रदर्शन संपन्न

शालेयवृत्त सेवा
0

 



नंदुरबार ( प्रतिनिधी गोपाल गावीत) :

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आले. जाहीर निकाल- उच्च प्राथमिक गट प्रथम मयूर योगेशकुमार गवते गणितीय प्रयोगशाळा डी.आर. हायस्कूल, नंदुरबार मार्गदर्शक योगेश कुमार रमेशराव गवते, द्वितीय कु.मनस्वी रामानंद चव्हाण आधुनिक चष्मा (5 in 1) एकलव्य विद्यालय, नंदुरबार मार्गदर्शक मिलिंद बन्सीलाल वडनगरे, तृतीय ऋतुराज किशोर कड्रे टिश्यू कल्चर श्रीमती प्र.अ.सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल.


नवापूर मार्गदर्शक -श्रीमती पी.ए. पगार, राखीव सोहम रमेश वसावे बेबी कॅरींग बेड वनवासी विद्यालय, चिंचपाडा, नवापूर मार्गदर्शक एम.जे. देवरे, माध्यमिक गट प्रथम मोहित चंद्रकांत माळी साधे होममेड मायक्रोस्कोप एस एल माळी कनिष्ठ महाविद्यालय, तळोदा मार्गदर्शक किरण जी.सोनार, द्वितीय अनिरुद्ध बालाजी लांडगे की लॉगर एन. डी. आणि एम. वाय. सार्वजनिक हायस्कूल,नवापूर मार्गदर्शक व्ही. बी. पाटील, तृतीय संचिता नरोत्तम पाटील मॉडर्न सिस्टीम फॉर व्हेईकल श्रॉफ हायस्कूल, नंदुरबार मार्गदर्शक राजेंद्र मराठे, राखीव समीर किसन गावित लाईफ शेविंग स्टिक अनुदानित आश्रम शाळा, पांगरण ,नवापूर, मार्गदर्शक वाय.एस.पाटील.


अध्यापक साहित्य निर्मिती प्राथमिक गट श्रीमती अलका अशोक पाटील विज्ञान खेळणी जि.प.शाळा मोगरा अक्कलकुवा, अध्यापक साहित्य निर्मिती माध्यमिक गट प्रवीण सुरेश साळुंखे विज्ञान पेटी अनुदानित आश्रम शाळा बिलमांजरे नवापूर, प्रयोगशाळा कर्मचारी प्रायोगिक साधन गट कैलास भगवान नांद्रे इनोवेशन इन सायन्स अनुदानित आश्रमशाळा कोचरा, शहादा, लोकसंख्या शिक्षण प्राथमिक गट सौ.रश्मी परशुराम ढंढोरे हात धुणे सिद्धेश्वर विद्यालय समशेरपुर नंदुरबार, लोकसंख्या शिक्षण माध्यमिक गट देवीदास भिका पाटील लोकसंख्या वाढीची कारणे व परिणाम श्रॉफ हायस्कूल, नंदुरबार, जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात निवड करण्यात आलेल्या विद्यार्थी, शिक्षक बंधु भगिनी यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी  शुभेच्छा दिल्या. 


यावेळी मच्छिंद्र कदम शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद नंदुरबार, आर बी पाटील उपशिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद नंदुरबार, सी.डी पाटील उपशिक्षणाधिकारी (योजना) जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन घेण्यात आले. परीक्षक म्हणून मेजर डॉ. सुहास भावसार, प्राचार्य डॉ. महेंद्रसिंह रघुवंशी, प्राचार्य डॉ.संजय शिंदे यांनी परीक्षण केले. सदर प्रदर्शन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मिलिंद वडनगरे व त्यांच्या टीमने परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)