२ आक्टोंबर : कुसूम सभागृह नांदेड
नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
आदर्श शिक्षक व उपक्रमशील शाळांचा पुरस्कार वितरण सोहळा नांदेड येथील कुसुम सभागृहात 2 ऑक्टोबरला होणार असून या कार्यक्रमात माहूर तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आष्टा येथील गुणवंत आदर्श शिक्षक स्वप्निल खांडेकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवीआबादी येथील शिक्षिका प्राजक्ता लांडे,कला विशेष पुरस्कार रंजीत वर्मा व उपक्रमशील शाळा पुरस्कार करंजी केंद्रातील वायफनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा नांदेड यांच्या वतीने गुणवंत शिक्षक उपक्रमशील शाळा पुरस्कार वितरण सोहळा व जिल्हास्तरीय गुणवत्ता विकास शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला माहूर तालुक्यातून जास्तीत जास्त शिक्षकांनी उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद माहूर तालुका अध्यक्ष एस एस पाटील यांनी केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .