मतदान ओळखपत्राला आधार जोडणीसाठी माहुरात जनजागृती

शालेयवृत्त सेवा
0

 


महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा उपक्रम !


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

तहसिल माहूर च्या प्रांगणात मतदान ओळखपत्राला आधार जोडणीसाठीच्या जनजागृती मोहीमेची सुरवात जनजागृती ओडीओ क्लिपच्या वाहनाची फित कापून उद्घाटनाने करण्यात आले.


यावेळी माहूर तहसीलदार मा.यादव साहेब,म.रा.शिक्षक परिषद माहूर तालुकाध्यक्ष श्री.एस.एस.पाटील सर, या मोहिमेच्या उपक्रमाचे संकल्पक तथा संघटनमंत्री श्री.श्याम राठोड सर, तसेच अधिकारी व म.रा.शि.प.चे पदाधिकारी व कर्मचारी होते.


महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या या स्तुत्य उपक्रमासाठी तहसीलदार तथा दंडाधिकारी श्री.यादव साहेबांनी भरभरून कौतुक करत संघटनेच्या कार्यास शुभेच्छा दिल्या....!!!*

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)