सेवापूर्ती गौरव : लक्ष्मी गायकवाड विद्यार्थ्यांवर मातृतूल्य प्रेम करणारे व्यक्तिमत्व -व्यंकटेश चौधरी

शालेयवृत्त सेवा
0

 



उपक्रमशील शिक्षक रुपेश गाडेवाड यांच्या भित्तिपत्रकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन                             

नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

अक्षर परिवाराच्या साक्षात लक्ष्मी व त्यांच्या रुपाने सरस्वती आम्हाला लाभली व आमच्या अक्षर परिवारातील असंख्य विद्यार्थ्यांना त्यांनी मातृतुल्य प्रेम देऊन आपली व वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली. त्या कधीच आपल्या सहकार्याप्रती तक्रार न करता ते सदैव सकारात्मक दृष्टीने काम करत राहिल्या यामुळेच त्यांचा हा गौरव होत आहे. लक्ष्मी गायकवाड यांचे कार्य अक्षर परिवारातील सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. असे भावोदगार शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी काढले. 


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांगी येथील लक्ष्मी गायकवाड यांच्या सेवापुर्ती गौरव सोहळ्यात ते बोलत होते. त्यावेळी शिक्षक परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष मधुकर उन्हाळे अध्यक्ष स्थानी उपस्थित होते. जिद्द, चिकाटी व परिश्रमाची तयारी असेल तर जीवन बदलू शकते याची मूर्तीमंत उदाहरण म्हणजे लक्ष्मी गायकवाड, ह्या माझ्या मुदखेड गावच्या आहेत.मी त्यांना लहानपणापासून ओळखतो त्यामुळे त्या आज शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. या अनुषंगाने त्यांचा गावकरी व शाळेच्या वतीने सेवा गौरव होत आहे.


हा गौरव हा त्यांच्या संपूर्ण आयुष्यातील परिश्रमाचे फलित आहे. ते ज्या ज्या शाळेत गेले त्या त्या शाळेत त्यांनी आपले शैक्षणिक कार्य अतिशय जबाबदारीने पार पाडले. विद्यार्थी हेच माझे दैवत समजून ते विद्यार्थ्यांचे प्रसंगी आई वडील यांची भूमिका निभावली म्हणूनच आज वांगी येथे त्यांच्या कार्यकाळातील चिखली वसरणी येथील ग्रामस्थ या निरोप प्रसंगी त्यांचा गौरव करण्यासाठी उपस्थित आहेत, असे मनोगत शिक्षक परिषदेचे राज्य कार्यकारी अध्यक्ष मधुकर उन्हाळे यांनी व्यक्त केले. 


याप्रसंगी या सोहळ्याचे अध्यक्ष गोविंद जाधव, सरपंच दत्ता जाधव, मोगलाजी गंदपवाड, केंद्रप्रमुख रामेश्वर आळंदे, केंद्रीय मुख्याध्यापक बाबुराव जाधव प्रभारी मुख्याध्यापक अजित कदम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनायक जाधव, उपाध्यक्ष रुक्माजी जाधव, शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष दत्तप्रसाद पंडागळे, शिक्षक परिषदेचे जिल्हा कोषाध्यक्ष बालाजी पांपटवार ,  पदोन्नत मुख्याध्यापक शंकर पडगिलवार, यशवंत संस्थेचे सचिव विजयकुमार गबाळे आदि उपस्थित होते.


शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष भगवान बकवाड, शिक्षक  संघटनेचे पदाधिकारी तुकाराम जाधव पाटील, जगजित ठाकुर, व्यंकट गंदपवाड, चिखली येथील सरपंच तातेराव पाटील, गंगाधर जाधव, बालाजी जाधव, दिलीप जाधव, अशोक पार्डीकर, भरत पार्डीकर, तुकाराम कऊटकर, संगमेश्वर बिंदगे व तसेच वाजेगाव विभागातील सर्व मुख्याध्यापक शिक्षक बंधू भगिनी व वसरणी शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते. तर प्रास्ताविक व्यंकट गंदपवाड, सुत्रसंचालन सारंग स्वामी यांनी तरआभार गणपत मुंडकर यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)