केंद्रप्रमुखांची रिक्त पदे सरळसेवेने व मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे भरण्याकरीता स्पर्धा परीक्षेचे आयोजन करणेबाबतचे पत्र !
१. ग्रामविकास व जलसंधारण विभाग यांची अधिसूचना क्र. सेवाप्र-२०१३/प्र.क्र. १०६/आस्था-९ दिनांक १० जून, २०१४
२. मा. मंत्री, महोदय (शालेय शिक्षण व क्रिडा विभाग), यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ०५/०९/२०२२ व दिनांक ०७/०९/२०२२ रोजी पुणे येथे पार पडलेल्या बैठकीत मा.मंत्री महोदय यांनी दिलेले निर्देश.
३. मा. आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे - ०१ यांचे पत्र जा. क्र. मरापप/बापवि/२०२२/४४४/ दिनांक १५/०९/२०२२ उपरोक्त संदर्भिय १, २ व पत्र क्र. २ चे अवलोकन व्हावे.
मा. मंत्री (शालेय शिक्षण), यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ०७/०९/२०२२ रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे येथे पार पडलेल्या बैठकीत मा. मंत्री महोदयांनी केंद्र प्रमुखांची दिक्त पदे विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा व पदोन्नती द्वारे ५० : ५० भरण्याचे प्रमाण निश्चित करण्याचे निर्देश दिलेले आहेत.
त्याअनुषंगाने कळविण्यात येते की, यासंदर्भात केंद्रप्रमुखांचे निर्गमित सर्व शासन निर्णय व दिनांक १० जुन, २०१४ ची अधिसूचना विचारात घेऊन केंद्रप्रमुखांचा बिंदूनामावलीनुसार रिक्त पदांचा तपशिल संचालनालयास त्वरित उपलब्ध करुन द्यावा. जेणेकरुन केंद्रप्रमुखांच्या रिक्त पदांचा तपशिल उपलब्ध करुन दिल्यानंतर सर्व माहिती एकत्रित करुन मा. आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे याना सादर करणे सुलभ होईल.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .