नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
धर्माबाद येथील जिल्हा परिषद कन्या शाळेत रत्नाळी केंद्रांतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांची प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन अमृत महोत्सवाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेत प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली. त्यात रत्नाळी केंद्रातील कन्या शाळेसह रत्नाळी, पाटोदा बु. पाटोदा खु. मंगनाळी, अतकूर, बाभळी, शेळगाव थडी आणि बन्नाळी असे एकूण 09 शाळांच्या इयत्ता पाचवी ते सातवीचे प्रत्येकी दोन-दोन विद्यार्थी सहभागी झाले होते.
यावेळी केंद्राचे केंद्रप्रमुख आबासाहेब उस्केलवर, कन्या शाळा धर्माबादचे मु. अ. सी. एच. सय्यद, श्रीमती एस. ए. खेडकर, सौ. एम. डी. जोशी, सौ. मंगला वास्टर, सौ. गुंडाळे मॅडम, माधव हिमगिरे, एजाज सय्यद, बी. एम. वडजे, बी. टी. कदम, आर. एस. इंदुरकर, एस. एस. कामिनवार, एल. एन. गुडलावार या शिक्षकांची उपस्थिती होती. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात कन्या शाळेच्या मैदानावर ही प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली.
पाटोदा बु. शाळेचे गायत्री वानखेडे व चैतन्या वानखेडे आणि कन्या शाळेचे मधुमती गलांडे व प्रशिक वाघमारे या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत समान गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळवित तालुकास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले. स्पर्धेत यश मिळविलेल्या विद्यार्थी व शाळांचे केंद्रप्रमुख आबासाहेब उस्केलवार यांनी अभिनंदन केले. प्रश्नमंजुषा स्पर्धेचे उत्कृष्ट संचालन नासा येवतीकर यांनी केले तर माधव हिमगिरे यांनी सर्वांचे आभार मानले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .