मुंबई (विशेष प्रतिनिधीउदय नरे) :
राज्य सरकारी कर्मचारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने आयोजित आझाद मैदानातील आंदोलनात ४७ संघटनांचा सहभाग एकच मिशन जुनी पेन्शन या घोषणेचा जयघोष करत आज आझाद मैदानात मोठ्या संख्येने शिक्षक, कर्मचारी जमले होते. सोबत राज्य सरकारी कर्मचारीही होते.
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आज राज्यभर बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र मुंबईत आयत्यावेळी पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे आझाद मैदानात जमून शिक्षक, कर्मचारी यांनी जोरदार निदर्शने केली. घोषणा दिल्या, अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली.
शिक्षक भारती संघटना समन्वय समितीचा भाग असून शिक्षक भारतीने या आंदोलनासाठी आपला पाठींबा जाहीर केला होता. त्यानुसार राज्यभर मोठ्या संख्येने शिक्षक भारतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते या आंदोलनात सहभाग झाले होते. मुंबईत आझाद मैदानातही शिक्षक भारती पदाधिकारी, कार्यकर्ते यांची उपस्थिती लक्षणीय होती.
दोन महिन्याच्या आत नवीन सरकारने जुनी पेन्शन योजना लागू न केल्यास राज्यव्यापी बेमुदत उपोषण करण्याचा इशारा समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी दिला. यावेळी बृहन्मुंबई कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख, सचिव अविनाश दौंड, शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे, प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे, कार्यवाह प्रकाश शेळके, मनपा अध्यक्ष किसन महाडिक, महिला आघाडी अध्यक्षा संगीता पाटील, मुंबई अध्यक्षा कल्पना शेंडे, सलीम शेख, संजय गोविंदवार, शिवाजी खैरमोडे, उत्तर विभाग अध्यक्ष अकबर खान, चंद्रकांत भोसले, रिड्डी काबंळे, अशोक शिंदे, रहाटे सर, विजय गवांदे, मच्छिंद्र खरात, किसन शिकारे, प्रमोदिनी दवंडे, सुजाता जाधव, मोतीराम नागम,देशपांडे सर, संतोष नरुटे, अजिंक्य पुरी, दयानंद शिनगारे, कांचनमाला वाफारे, जयवंत राऊत, बाळासाहेब चव्हाण, भाऊसाहेब पानमंद, भीमराव वलेकर, नाना राजगे, सरगर सर, महानवर सर, सुर्यवंशी सर, माळी सर, देशमुख सर आदी उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .