जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया..उद्यापासून सुरू होण्याची शक्यता .. | Intra District transfer process..likely to start from tomorrow..

शालेयवृत्त सेवा
0



जिल्हाअंतर्गत बदली अपडेट :


ऑनलाइन पोर्टल द्वारे जिल्हा परिषद शिक्षकांच्या सुरू असलेल्या बदल्यांमध्ये जिल्ह्यांतर्गत बदल्या उद्या सुरू होणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. जे शिक्षक बदली पात्र आहेत किंवा बदली अधिकार प्राप्त आहेत त्यापैकी काही शिक्षकांना ई-मेलवर 'टुमारो इंट्रा डिस्टिक ट्रान्सफर विल स्टार्ट' अशा प्रकारचा संदेश प्राप्त झाला आहे.


याव्यतिरिक्त आपण जर विन्सेस प्रायव्हेट लिमिटेड ने तयार केलेले ऑनलाइन बदली पोर्टल ओपन केल्यास त्यावर आपल्याला 'जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया लवकरच सुरू करण्याच्या तयारीत.'

In preparation of starting Intra District Transfer Process soon. 

अशी सूचना इंग्रजी व मराठी मधून देण्यात आलेली दिसून येईल.


त्यामुळे जे शिक्षक जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. उद्यापासून जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सुरू होणार आहे.

अर्थात या संदर्भात उद्या किंवा आज शासन निर्णय निर्गमित होऊ शकतो. शासन निर्णयानुसार नेमकी कोणत्या संवर्गाला कधी अर्ज भरण्याची संधी उपलब्ध होते हे निश्चित होईल.

जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया..उद्यापासून सुरू होण्याची शक्यता.... या अर्थाच्या बातमी सर्वच सोशल मिडियावर आज वायरल झाली आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)