मुलांना समजून घेण्याचे उपाय | What to do to understand children?

शालेयवृत्त सेवा
0

 




👉 मुलांशी बोलत असताना तुमचा फोन

नेहमी बंद ठेवा.

👉मूल काय म्हणते आहे, हे लक्ष

देऊन ऐका.

👉त्यांच्याबरोबरील संवादात सहभागी व्हा.

👉त्यांची मते आणि दृष्टिकोन मान्य करा.

👉त्यांच्याकडे आदराने पहा.

👉नेहमी त्यांचे कौतुक करा.

👉चांगल्या बातम्या, घटना त्यांच्याशी

शेअर करा.

👉त्यांचे मित्र आणि त्यांना आवडणाऱ्या

व्यक्तींशी नीट बोला.

👉 त्यांच्या चांगल्या गोष्टी आठवणीत ठेवा.

👉जर मूल एखादी घटना दुसऱ्यांदा सांगत

असेल, तर तुम्ही जणू पहिल्यांदाचा ऐकता

आहात अशा आविभार्वात प्रतिसाद द्या.

👉 जुन्या त्रासदायक आठवणी त्यांच्यासमोर

मांडू नका.

👉 त्यांच्या उपस्थितीत एका बाजूला जाऊन

बोलणे टाळा.

👉त्यांच्या मतांकडे, विचारांकडे दुर्लक्ष करू

नका किंवा टीका करू नका.

👉त्यांच्या वयाचादेखील मान ठेवा.

👉 मूल बोलत असताना त्याचे बोलणे

अर्धवट तोडू नका.

👉तुमच्या उपस्थितीत मुलांकडे नेतृत्वाचे

अधिकार द्या.

👉मुलांशी बोलताना आवाज चढवू नका.

👉 चालताना त्यांच्या पुढे राहून चालू नका.

👉 आपण कौतुकासाठी पात्र नाही, हे मुलांना माहीत असते. त्या परिस्थितीतही त्यांचे कौतुक करा.

👉त्यांच्यासमोर टीपॉयवर किंवा समोरच्या

खुर्चीवर पाय पसरून बसू नका.

त्यांच्याकडे पाठ करूनही बसू नका.

👉मुलांच्या वेदना आणि चिंता तुम्हाला समजतात, हे त्यांना जाणवू द्या.

👉 त्यांच्या वाईट गोष्टींबद्दल कुणी बोलत

असते तेव्हा लगेच तुम्ही त्यांच्या सुरात

सूर मिसळून बोलू नका.

👉त्यांच्या उपस्थितीत तुम्ही कंटाळला

आहात असे दाखवू नका.

👉 त्यांच्या चुकांवर हसू नका.

👉त्यांच्याशी बोलताना शब्दांची निवड

जपून करा.

👉 त्यांना त्यांच्या नावाने हाक मारा. त्यांना

ते आवडते.

👉कशापेक्षाही आणि कुणापेक्षाही त्यांना,

सर्वाधिक प्राधान्य द्या.


          ✍️ संकलित @ शालेयवृत्त

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)