शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेतच मिळणार विविध प्रमाणपत्रे - सौम्या शर्मा

शालेयवृत्त सेवा
0

 



सेवा पंधरवड्यात नियोजन : देगलूर मुखेड तालुक्यात कार्यक्रम


नांदेड (शालेय वृत्तसेवा) : 

सर्वसामान्यांची कामे विहित वेळेत होण्याच्या दृष्टीने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा साजरा केला जात आहे. या अनुषंगाने देगलूर व मुखेड तालुक्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना महसूल विभागामार्फत देण्यात येणारे उत्पन्न जात नॉन क्रिमीलेअर रहिवासी ई डब्ल्यू एस अशी विविध प्रमाणपत्र मिळणार आहेत असे देगलूरच्या सहाय्यक जिल्हाधिकारी सौम्या शर्मा यांनी सांगितले. 


या पंधरवड्यात नागरिकांचे अर्ज तक्रारी यांचा विहित कालमर्यादेत निपटारा करण्यात येणार आहे. या काळात मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शाळांमध्ये जात प्रमाणपत्राचे वाटप केले जाणार असल्याची माहिती समाज कल्याण विभागाच्या आयुक्त यांनी दिली आहे. महसूल विभागामार्फत देण्यात येणारे प्रमाणपत्रात उत्पन्न प्रमाणपत्र नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र वय व अधिवास प्रमाणपत्र राष्ट्रीय प्रमाणपत्र टी डब्ल्यू एस प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र यांचा समावेश आहे. प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे संबंधित शाळेतील विद्यार्थ्याकडून मुख्याध्यापक व प्राचार्यांनी संकलित करावी.

 

सर्व शाळा मधील संबंधित मुख्याध्यापक व प्राचार्याने 23 ते 30 सप्टेंबर या कालावधीत सर्व कागदपत्रे संकलित करून शाळेजवळ असलेल्या सेतू सुविधा केंद्राकडे सादर करावेत अधिक माहितीसाठी माधव कांबळे ( ८४८२८७८२८८ ) यांच्याशी मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)