हिमायतनगर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात खडकी (बा) केंद्राचा दबदबा..

शालेयवृत्त सेवा
0

 


 कु.वैष्णवी  देवसरकर आणि श्रीमती विमल माळी प्रथम तर नाट्यमहोत्सवातही मारली बाजी !


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :  

हिमायतनगर तालुक्यात दरवर्षी शिक्षण विभागाकडून तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धा आयोजित करण्यात येते यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना दिशा देणारे एक व्यासपीठ म्हणून ओळखले जाते त्याचा उपयोग करून आपल्या भागातील विद्यार्थ्यांनी जिल्हा पातळीवर विद्यार्थ्यांची कल्पक शक्ती व वैज्ञानिक दृष्टिकोन कशाप्रकारे विकसित करण्याचे काम झाले पाहिजे यासाठी नुकतेच प्रदर्शन संपन्न झाले.


तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन घेऊन ग्रामीण भागातून वैज्ञानिक घडविण्याचा हा उद्देश शिक्षण विभागाचा असतो त्यामुळे आज दिनांक 2 सप्टेंबर रोजी शिक्षण विभागाकडून शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल शाळेत 49 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात 26 शाळेने सहभाग घेऊन उस्फुर्त प्रतिसाद दिला यामध्ये खडकी बाजार केंद्रातील शाळेंनी यश मिळविले.

 


 इयत्ता 6 वी ते 8 वी उच्च प्राथमिक गट

 तृतीय क्रमांक 

 प्रयोग -पर्यावरण पूरक सामग्री 

( जि.प.प्रा.शा.विरसनी )


इयत्ता 9 वी ते 12 वी

माध्यमिक गट

 तृतीय क्रमांक 

प्रयोग - उर्जा स्थानांतरण

( परमेश्वर विद्यालय, विरहिणी )


नाट्योत्सव

प्रथम क्रमांक

लसिकरण कथा

( हु.ज.पा.वि.खडकी बाजार )


 विज्ञान मेळावा

 प्रथम क्रमांक

कु.वैष्णवी तुकाराम देवसरकर

( जि.प‌.हायस्कूल कामारी )


 शिक्षक निर्मित शैक्षणिक साहित्य प्रदर्शन

 प्रथम क्रमांक

श्रीमती विमल आनंदराव माळी

( जि.प.कें.प्रा.शा.खडकी बाजार )




सर्व सहभागी शाळा व विजेत्यांचे गटशिक्षणाधिकारी श्री बालाजी शिंदे साहेब, विस्तार अधिकारी श्री.अरुण पाटील, केंद्र प्रमुख श्री.रावते साहेब, केंद्रीय मुख्याध्यापक श्री भूतनर सर आदिंनी  अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)