शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा: राज्याचे शालेय शिक्षणमंत्री मा.ना. श्री.दिपकजी केसरकर यांना दिले निवेदन | Implement Old Pension Scheme to Teaching-Non-Teaching Staff: State School Education Minister Hon. Statement given to Mr. Deepakji Kesarkar

शालेयवृत्त सेवा
0

 




औरंगाबाद ( शालेय वृत्तसेवा ) :

राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री मा.ना.श्री.दिपकजी केसरकर साहेब हे औरंगाबाद जिल्हा दौऱ्यावर आले असताना महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन चे राज्य प्रवक्ता तथा हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सर यांनी आज त्यांची विमानतळावर सुमारे अंदाजे रात्री 10 वाजता भेट घेतली. विद्यार्थी-शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर आधारित चर्चा करून एक निवेदन सादर केले.


निवेदनात खालील प्रश्न सोडविण्याची विनंती केली...


१) नोव्हेंबर 2005 च्या नंतर सेवेत रुजू झालेले शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी.

२) राज्यात शिक्षकांचे रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी.

३) २०% व ४०% अनुदानित शाळांना प्रचलीत नियमानुसार शंभर टक्के अनुदान देण्यात यावे.

४) त्रुटी पात्र शाळांना अनुदान घोषित करण्यात यावे.

५) सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सरसकट प्रोत्साहन भत्ता तसेच पहिल्या दिवसापासून गणवेश देण्यात यावे.

६) शिक्षण सेवक मानधनात त्वरित वाढ करण्यात यावे.

७) शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कॅशलेस आरोग्य योजना त्वरित लागू करावे.

         

शालेय शिक्षण मंत्री महोदयांना आपल्या स्तरावर लक्ष देऊन सर्व विद्यार्थी शिक्षकांचे प्रश्न सोडवावे तसेच महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेसोबत एक बैठक मंत्रालयात आयोजित करावी अशी विनंती करण्यात आली. या वेळी हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे संस्थापक सदस्य शाहरुख पठाण, सदस्य शेख अलीम आदींची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)