आपल्या आईच्या स्मरणार्थ व्यंकट गंदपवाड या शिक्षकांने विद्यार्थ्यांनां केले शैक्षणिक साहित्य वाटप !

शालेयवृत्त सेवा
0

 


कै.रामबाई गंदपवाड यांच्या पुण्यतिथी निमित्त एक हजार विद्यार्थ्यांना मिळाले शैक्षणिक साहित्य !


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

आई हि जगातील सर्व श्रेष्ठ ईश्वरीय देणगी असून आईचे उपकार आपण कधीही परतफेड करु शकत नाही.आईच्या संस्कारामुळेच मी घडलो.तेच संस्कार बीज  मी शैक्षणिक उपक्रम राबवून रुजवण्याचा प्रयत्न  करत आहे.असे आई प्रती व्यक्त होताना व्यंकट गंदपवाड  यांनी भावोदगार काढले.



महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हा संपर्क प्रमुख तथा शिक्षण पतसंस्थेचे  संचालक व्यंकट गंदपवाड हे दरवर्षी  शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवत असतात ,यावर्षी मातोश्री च्या चतुर्थे पुण्यस्मरण दिनानिमीत्त....

जिल्हा परिषद  हायस्कुल (मुलींचे मुखेड

जिल्हा परिषदा केद्रिय प्राथमिक शाळा (ब्रॕन्च) मुखेड

जिल्हा  परिषद केंद्रिय  प्राथमिक शाळा मुखेड

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रावी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांब

या पाच शाळेतील एक हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य शिष्यवृत्ती संच,नवोदय विद्यालय संच,पेन,पेन्सिल ,वही सचित्र बालमित्र उजळणी याच वाटप करण्यात आले.


शिक्षक परिषदेचे मार्गदर्शक संजय कोरे, मोगलाजी मामा गंदपवाड जि. प. हायस्कुलाचे मुख्याध्यापक मारोती कांबळे, पदोन्नत मुख्याध्यापक दिलीपराव किनाळकर,केंद्रीय मुख्याध्यापक दिनबंधु बनसोडे, रावी शाळेचे मुख्याध्यापक अनिल मारमवार, जांबचे मुख्याध्यापक महेबुब कासार, शिक्षक नेते दिलीपराव देवकांबळे,दिपक लोहबंदे , खमरुदिन मुजावर ,केंद्रप्रमुख शिवाजी कराळे,केंद्रप्रमुख मधुकर गायकवाड ,शिक्षक परिषदेचे जिल्हा संघटक पांडुरंग दिनकर,जिल्हा सहासचिव सुधीर शृंगारे,जिल्हा उपाध्यक्ष  बालाजी राऊतवाड , तालुका अध्यक्ष बस्वराज निर्णे,तालुका कोषाध्यक्ष सुभाष दिग्रसकर,नारायण गंदपवाड यांच्या हस्ते करण्यात आले.

               


याप्रसंगी कल्याण इंगळे, मोहनावती पतसंस्थेचे संचालक शरद डावकरे, माधव माधसवाड आरविंद थगनारे चंद्रकांत कडकंजे रमेश आचमारे,ईरेश बारलावार, हरी चव्हाण ,व्यंकट पाटील,राहुल मेहराकर ,  आशोक तलवारे,सुर्यकांत बेलुरे ,व्यंकटी केंद्रे ,राजु दासारवाड ,नारायण भोसले, आप्पाहरी चव्हाण,लक्ष्मण करेवाड , संजय मोरे, वैजनथ  साताळे,वसंत पाटील,लक्ष्मण धुळशेट्टे ,रामराव चव्हाण,भारत सिंगनवाड ,कैलास कोंडलवाडे ,संगमनाथ पवरेकर ,  महंमद आत्तार,बस्वलींग काळवणे, श्रीमती आशालता स्वामी,सौ प्रयागबाई बिंचकुंदे, सौ सुनीता आलमले,सौ शिला उबाळे,सौ सुशिला गवते,सौ श्रीदेवी जगताप,सौ आश्विनी कुलकर्णी ,सौ सुजाता बिराजदार,रेखा तमशेट्टे,सौ सविता उमाटे,श्रीमती मनिषा पाटील,सौ सुनिता सुत्रावे,सौ रेखा दिनकर, सौ संगिता पाटील,सौ सुनीता पाटील,सौ सुरेखा राठोड,सौ शितल चामलवाड,सौ मधुमालती लोणीकर,सौ आरती गादगे,श्रीमती ज्योती  पांचाळ, श्रीमती कमल बेळगे, श्रीमती संगिता बनसोडे, श्रीमती सुनंदा  गादगे, सौ आश्विनी देशपांडे ,सौ सुरेखा स्वामी,सौ बबिता घेरे, सौ नागसेना येवतीकर,सौ सरस्वती शिंदे,सौ सारिका होनवडजकर,सौ उषा मडाबल्मेवार ,सौ रत्नमाला मलभागे यांच्या सह शिक्षक बंधुभगिनी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)