' आम्ही चालवू आमची शाळा ' या उपक्रमांतर्गत विद्यार्थी शिक्षकाप्रती कृतज्ञता दर्शविणारा - मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे | CEO Varsha Thakur-Ghuge

शालेयवृत्त सेवा
0


५ सप्टेंबर : शिक्षक दिनानिमित्त प्रत्येक शाळेवर हा उपक्रम होणार उत्साहात !


नांदेड (शालेय वृत्तसेवा) :

पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन नांदेड जिल्हा परिषद अभिनव पद्धतीने साजरा करणार असून 'आम्ही चालवू आमची शाळा ' या उपक्रमांतर्गत विद्यार्थी शिक्षकाप्रती कृतज्ञता दर्शविणारा असून विद्यार्थीच स्वयंस्फूर्तीने शाळा चालवतील असे निर्देश नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी दिले.



शालेय गुणवत्ता विकास शिक्षण विभागातील प्रलंबित कामे आदर्श शाळा विभागीय आयुक्त यांच्या फ्लॅटशिप कार्यक्रमातील मुद्दे या अनुषंगाने आज सर्व शिक्षण विभागातील अधिकारी कर्मचारी आणि गटशिक्षणाधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दीर्घकाळ चाललेल्या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम सांगितले. 



आयुक्ताच्या फ्लॅटशिप उपक्रमांतर्गत शास्त्रज्ञांची जयंती परमवीर चक्र विजेत्यांची जयंती ऑलिंपिक स्पर्धेत विजेत्यांची जयंती खगोलशास्त्र क्लब लाइफ क्लब विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर शाळा ग्रंथालय नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र आदी संदर्भाने विस्तृत मार्गदर्शन केले.



विद्यार्थ्यांच्या नेतृत्वगुणांना वाव मिळावा विद्यार्थ्यांना व्यवस्थापन करता यावे यासाठी ५ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांमधूनच मुख्याध्यापक आणि विद्यार्थ्यांमधूनच शिक्षक शाळा चालवणारा असून आपल्या शिक्षकाप्रती या उपक्रमाच्या माध्यमातून कृतज्ञता दर्शवणार आहेत. या बैठकीला प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉक्टर सविता बिर्गे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर जिल्ह्यातील गट शिक्षणाधिकारी व सर्व शिक्षा अभियानातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)