वैजाली जि.प.शाळेत शहीद भगतसिंग यांची जयंती साजरी

शालेयवृत्त सेवा
0

 



नंदुरबार  (शालेय वृत्तसेवा ) :

शहादा तालुक्यातील जि.प वैजाली शाळेत शहीद भगतसिंग यांची जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून, पुजन करुन करण्यात आली. 


कार्यक्रमाचे प्रमुख भरत पावरा यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हणाले, क्रांतिकारी नेते भगतसिंग हे स्वातंत्र्यलढ्यात सामील असलेल्या एका कुटुंबाचे होते, म्हणूनच ते लहान वयापासूनच भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीकडे ओढले गेले. त्यांनी असहकार चळवळीत महात्मा गांधींना पाठिंबा दिला आणि जालियनवाला बाग हत्याकांड (१९१९) आणि नानकाना साहिब येथे नि:शस्त्र अकाली आंदोलकांवर झालेल्या हिंसाचारामुळे प्रभावित झाले.


भगतसिंग हे नास्तिक होते आणि भांडवलशाहीच्या तीव्र विरोधात होते. शेतकरी आणि कामगारांना ब्रिटिश राजवटी विरुद्ध लढण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी भगतसिंग यांनी १९२६ साली ‘नौजवान भारत सभेची’, स्थापना केली. ते त्या संस्थेचे सचिव होते. १९२८ मध्ये त्यांनी सुखदेव, चंद्रशेखर आझाद आणि इतरांसह , ‘हिंदुस्तान सोशालिस्ट असोसिएशनची’, स्थापना देखील केली . 


पूढे बोलताना ते म्हणाले,भगतसिंगांचे प्रेरणादायक कोटेशन “ते मला मारू शकतात, पण ते माझ्या कल्पनांना मारू शकत नाहीत. ते माझ्या शरीराला चिरडून टाकू शकतात, पण ते माझ्या आत्म्याला चिरडू शकणार नाहीत.” भारतीय क्रांतिकारकांचे मेरुमणी म्हणून शहीद भगतसिंग यांना ओळखले जाते. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील भगतसिंग यांचे योगदान खूप महत्वाचे आहे.त्यांनी सर्व तरुणांना ब्रिटिशांच्या विरोधात लढा देण्यासाठी एकत्र केले. अध्यक्षिय समारोपात चंदु पाटील म्हणाले, भगतसिंग यांच्या कार्यामुळेच आपल्याला स्वातंत्र्याची फळे चाखायला मिळाली आहेत. आंतरराष्ट्रीय माहितीचा अधिकार विषयी माहिती देण्यात आली. 


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उषा पाटील यांनी केले तर आभार राजू मोरे यांनी मानले. यावेळी मुख्याध्यापक सुदाम पाटील व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक  चंदु पाटील, राजू मोरे, उषा पाटील, गोपाल गावीत यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)