'आपले गुरुजी ' या उपक्रमांतर्गत वर्गात शिक्षकाचा फोटो लावण्याचा निर्णय रद्द करा !

शालेयवृत्त सेवा
0

 




प्राथमिक शिक्षक संघटना कृती समितीची मागणी !


कोल्हापूर (शालेय वृत्तसेवा) :

 सर्व प्राथमिक शिक्षक संघटना कृती समिती कोल्हापूरच्या संघटनेचे ' आपले गुरुजी ' या उपक्रमात वर्गात शिक्षकांचा फोटो लावण्याचा निर्णय रद्द करणे बाबत निवेदन दिले आहे.


'आपले गुरुजी ' या उपक्रमांतर्गत वर्गात शिक्षकांचा फोटो लावण्याचा निर्णय रद्द करण्यासाठी सर्व प्राथमिक शिक्षक संघटना कृती समिती कोल्हापूरने निवेदन दिल्यामुळे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांनी माननीय शिक्षण संचालक (प्राथमिक) प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना पुढील कार्यवाहीसाठी निवेदनाच्या प्रतिसह पाठविले आहे. 


शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे याबाबतीत काय निर्णय घेणार याची उत्सुकता आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)