सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन- CBSE ने 10वी आणि 12वी बोर्ड 2023 परीक्षांसाठी CBSE नमुना पेपर प्रसिद्ध केले आहेत. हे नमुना पेपर 2023 CBSE च्या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थ्यांसाठी नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
10वी आणि 12वीचे विद्यार्थी CBSE च्या वेबसाइट cbse.gov.in आणि cbseacademic.nic.in वरून बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी उपलब्ध असलेले हे नमुना पेपर डाउनलोड करू शकतात. या नमुना पेपरचा सराव विद्यार्थ्यांसाठी मुख्य परीक्षा देण्यासाठी सहाय्यक ठरू शकतो. इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी हे पेपर डाउनलोड करून या पेपरचा सराव करावा असे आवाहन सीबीएससी तर्फे करण्यात आले आहे.
सराव पेपर डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकला क्लिक करा.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .