राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर, दिवाळी आधीच 38% प्रमाणे महागाई भत्ता. !

शालेयवृत्त सेवा
0

 



महागाई वाढल्याने मोदी सरकारने केंद्रीय कर्मचारी तसेच निवृत्तीवेतन धारक कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2022 पासून 4% महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आली आहे. यामुळे आता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा आयोगानुसार , 38% प्रमाणे महागाई भत्ता मिळणार आहे .केंद्र शासनाच्या याच धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वाढ होणे अपेक्षित आहे. दिवाळी पुर्वी महागाई भत्त्यामध्ये वाढ केल्याने यांचा थेट परिणाम आर्थिक देवाणघेवाणीवर आवश्यक होईल व यांचा लाभ प्रत्येक घटकाला मिळेल.

             

केंद्र सरकारच्या 4 % DA वाढीच्या धर्तीवर , राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना देखिल DA मध्ये वाढ मिळण्याची मोठी शक्यता आहे .महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने राज्य शासनास निवेदन सादर केले असून , यामध्ये नमूद करण्यात आले की, शिंदे सरकार कर्मचारी यांच्या बाबतीत सकारात्मक असुन राज्यातील शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2022 पासून केंद्र सरकार प्रमाणे 4 % वाढीव महागाई भत्ताबाबतचा निर्णय दिवाळी सणापूर्वी घेण्यात यावा .अन्यथा कर्मचाऱ्यांकडून आंदोलनांचा पवित्रा घेण्यात येणार आहे .यामुळे सरकारला DA वाढीबाबत ,लवकरच सकारात्मक निर्णय घ्यावे लागणार आहे .

        

राज्य कर्मचाऱ्यांचे 02 ऑक्टोबर रोजी जुनी पेन्शन , वाढीव महागाई भत्ता बाबत इ.मागणीसाठी आंदोलन आयोजित करण्यात आले असल्याने सरकारला कर्मचाऱ्यांच्या मागणीवर दिवाळीपूर्वी सकारात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे . आणि सरकार याबाबत सकारात्मक असल्याचे विशेष सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.




दिवाळीपूर्वी DA वाढचे गिफ्ट देणार शिंदे सरकार?


माहे जुलै 2022 पासून 4 % DA वाढ करून राज्य शासकीय व निवृत्तीवेतन धारक कर्मचाऱ्यांना दिवाळीचे मोठे गिफ्ट राज्य सरकारकडून देण्याची शक्यता आहे .4% DA वाढ लागू केल्यास राज्य कर्मचाऱ्यांचा एकूण DA 38 % होईल .

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)