नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
किनवट तालुक्यातील कमठाला केंद्रांतर्गत वडोली जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक शेखर मलकू कुमरे हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांच्या निरोप समारंभ मोठ्या थाटात संपन्न झाला .
कार्यक्रमास केंद्रप्रमुख विजय मडावी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश आंबटवार, काहूरकार रामस्वरूप मडावी, उमरी बाजारचे सरपंच कौशल्याबाई मेश्राम, चेअरमन सुखदेव मेश्राम, सारखणी येथील केशवे विद्यालयाचे मुख्याध्यापक बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनानंतर उपस्थित मान्यवरांचे वडोली शाळेचे मुख्याध्यापक किशन धुर्वे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. पहिल्या सत्रात शिक्षण परिषद अंतर्गत लोणी शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका शाहीन बेग यांनी 'शिकू आनंदे ' या विषयावर बोलले तर राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका शालिनी शेलुकर यांनी 'विद्याप्रवेश ' या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. केंद्रप्रमुख मडावी यांनी प्रशासकीय सूचना दिल्या.
दुसऱ्या सत्रात वडोली शाळेचे शिक्षक शेखर कुमरे व त्यांच्या पत्नी अनुसया कुमरे यांचा कमठाला केंद्राच्या वतीने कापड भेट हार पुष्पगुच्छ देऊन निरोप देण्यात आला. याप्रसंगी विद्या श्रीमेवार या उपक्रमशील शिक्षिकेने सुंदर गीत गायन केले. यावेळी रामस्वरूप मडावी, देविदास वंजारे, मुख्याध्यापिका वर्षा कुलकर्णी, विजय मडावी, शेवटी शेखर कुमरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश मुनेश्वर यांनी केले तर आभार किशन धुर्वे यांनी मानले. स्वादिष्ट भोजनानंतर कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी मारेगावचे केंद्रप्रमुख रमेश खूपसे, मुत्तेपवार सर , येरावार सर , चंद्रशेखर सर्पे , पद्माकर भवरे परमेश्वर महामुने , प्रशांत शेरे, प्रविण पिल्लेवार, बाबासाहेब आढाव, गोळकोंडवार सर , वाढे सर, मोरताडे सर, पाटील मॅडम, सांगवीकर मॅडम , परभणकर मॅडम यांच्यासह कमठाला केंद्रातील सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .