सैनिक समाधान पाटील यांच्या हस्ते जि.प.वैजाली शाळेत ध्वजारोहण संपन्न..

शालेयवृत्त सेवा
0





नंदुरबार ( शालेय वृत्तसेवा ) :
देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वैजाली येथे सकाळी प्रभातफेरी काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामूहिक राष्ट्रगीत गायन केले. वैजाली शाळेत ध्वजारोहण सैनिक समाधान पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 

वैजाली शाळेने एक अनोखा उपक्रम घडवून आणला यावेळी बोलताना सांगितले की, ज्या व्यापक लढ्यातून देशाने स्वातंत्र्य मिळविले , देशासाठी अनेक देशभक्तांनी आपले बलिदान दिले त्या भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासाला नव्या पिढीपर्यंत पोहोचवले तर त्यांच्या मनात देशाप्रती अधिक कृतज्ञता निर्माण होईल . " हर घर तिरंगा ” अर्थात घरोघरी तिरंगा हा उपक्रम केवळ देशभक्ती पुरता मर्यादित नाही तर आपल्या कर्तव्यालाही अधोरेखित करणारा उपक्रम आहे. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान जिल्हाभरात हा तिरंगा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. 

मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व सहकार्यांनी आज मला जो मान दिला आहे हा माझ्या जीवनातील अतुलनीय असा प्रसंग आहे. माझ्या या सर्व विद्यार्थ्यांचा मला नेहमीच सार्थ अभिमान आहे, असेही मत सैनिक समाधान पाटील यांनी व्यक्त केले. 

यावेळी माजी सैनिक लोटन पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रविण पाटील, उपाध्यक्ष दिनेश साळुंखे, सरपंच विनोद पाटील, माजी सरपंच श्रीराम पाटील, ग्रामविकास अधिकारी जितेंद्र चव्हाण, प्रशासक बच्छाव नाना, वि.विकास कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष डॉ.तळेकर, शाळेचे मुख्याध्यापक सुदाम पाटील, शिक्षक चंदू पाटील, भरत पावरा, राजू मोरे, उषा पाटील, गोपाल गावीत तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)