ग्रामस्थांचा पुढाकार : शाळेसाठी लोकवर्गणीतून उभारले तब्बल साडेपाच लाख !

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड (शालेय वृत्तसेवा) :

गावाच्या विकासात शाळेचा आणि शाळेच्या विकासात गावाचा सहभाग असतो. गावात शाळा असून चालत नाही तर शाळेत गाव असला पाहिजे. या उक्तीचा प्रत्यय तांड्यातील लोकांनी प्रत्यक्ष कृतीत आणण्याचे काम लोहा तालुक्यातील भीमला तांडा (गोविंद तांडा) येथील तांडावाशी यांनी जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग खोली बांधकामासाठी जागा उपलब्ध करून दिली.


जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग खोली बांधकामासाठी जागा उपलब्ध  नव्हती तेव्हा प्रशासनाच्या मदतीची वाट न पाहता मुलांच्या शिक्षणासाठी आपणही काही केलं पाहिजे यासाठी शालेय व्यवस्थापन समितीच्या पुढाकाराने व ग्रामस्थांच्या सहकार्यातून शाळेसाठी तब्बल साडेपाच लाख रुपयांचा निधी उभारून शाळेसाठी जमीन खरेदी केली. 


यासाठी शेकडो कष्ट करायच्या मदतीचा हात पुढे आले व मोठे परिवर्तन घडवून निधी उभारला त्यामुळे वर्गखोल्या अभावी विद्यार्थ्यांचे होणाऱ्या गैरसोय ठरली असून तांडातील दात्रत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


भीमला तांडा ( गोविंद तांडा ) उंबरा लगतचा तांडा असून लोहा तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेला हा तांडा आहे. येथील कुटुंबाची संख्या १०० ते १४० आहे तांडावाशीय सर्व लोक ऊस तोड व मजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात तांड्यात जिल्हा परिषद चे पाचवी पर्यंत शाळा आहे पण तीनच खोल्यामुळे शिक्षकांना शाळेच्या वरवंड्यात बसवून शिकवावे लागते जागे अभावी मुलांच्या शिक्षणात व्यक्त यायचा पाणी पाऊस मुळे दोन दोन तीन वर्ग एकत्र बसवावे लागत त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते त्यामुळे येथील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गुलाब जाधव यांनी पालकांची सभा घेऊन समस्या मांडली व यासाठी सर्वांनी वर्गणी जमा करण्यासाठी मंजुरी दिली.


 प्रत्येक घरातून वर्गणी जमा करून लोक वर्गणीतूनच साडेपाच लाख रुपये जमा केले त्यातून चार गुंठे जमीन शाळा बांधकामासाठी घेतली व आणखी दोन खोल्या मंजुरीचा प्रस्ताव आहे. या विधायक कामासाठी समितीचे उपाध्यक्ष पंडित राठोड नामदेव पवार शेषराव जाधव नागोराव चव्हाण गोविंद महाराज वसंत जाधव पंडित रामा राठोड बालाजी राठोड रघुनाथ राठोड रामदास राठोड भीमराव राठोड चंदू चव्हाण शंकर राठोड गुलाब चव्हाण नारायण चव्हाण बाबाराव जाधव दादाराव पवार दयानंद राठोड मुख्याध्यापक सय्यद शितळे सर कुंडलवाडी कर सर शिंदे सर अधिकारी आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)