शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावेत - गटशिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के

शालेयवृत्त सेवा
0

 



 शेवडी बाजीराव  केंद्राची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न..


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

आजच्या अतिजलद गतीने धावणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षकांनी नवी कौशल्ये आत्मसात करण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांनी शिक्षण परिषदेत केले. यावेळी शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर, विषय शिक्षक रामदास कस्तुरे,  किरवले, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  बळीराम मुदगुले, उपाध्यक्ष दत्ता उराडे, शेवडीचे मुख्याध्यापक आनंदा नरवाडे, या शिक्षण परिषदेचे सुलभक गुंडाळे, संतोष घटकार, जामकर आदींची उपस्थिती होती.

           

दक्षिण विभागातील शेवडी बाजीराव केंद्राची आॅगस्ट महिन्याची शिक्षण परिषद दगडगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत   केंद्रप्रमुख नागोराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली शेवडी केंद्रातील सर्व शिक्षकांची शैक्षणिक वर्षातील तिसरी शिक्षण परिषद उत्साहात आणि आनंददायी वातावरणात पार पडली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . कार्यक्रमाच्या सुरवातीलाच दगडगाव शाळेच्या मुलींनी उत्कृष्ट स्वागत गीत व देशभक्तीपर गीतांचे सुंदर सादरीकरण करून उपस्थितांना आंनदीत केले. जि. प. प्रा. शा .दगडगावचे मु.अ. अशोक राऊत यांनी प्रस्ताविकपर भाषणात शाळेची सांख्यिकी व राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाविषयी माहिती दिली .


 गटशिक्षणाधिकारी  सोनटक्के यांनी प्रशासकिय आढावा घेऊन गुणवतापुर्ण शिक्षणासाठी विद्यांजली नोंदणी, आधार अपडेट, अल्पसंख्याक शिष्यवृत्ती, मोफत गणवेश, उपस्थिती भत्ता वाटप , शालेय पोषण आहार, मूल्यमापन नोंदी, भाषा पेटी, गणित पेटी वापर अशा विविध विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले .     


त्यानंतर शिक्षण परिषेदेमध्ये नियोजित विषयानुसार खडकमांजरी  शळेच्या सहशिक्षिका गुंडाळे यांनी निपुण भारत अंतर्गत महत्वाच्या सर्व मुद्यावर प्रकाश टाकला. त्यानंतर जवळा पू . येथील जामकर आणि जवळा देशमुख येथील ढवळे जी. एस. यांनी विद्या अभ्यास अंतर्गत या महिन्यातील लेखन वाचन संदर्भात संदर्भात राबवले जाणारे उपक्रम याविषयी मार्गदर्शन केले.  त्यानंतर  संतोष अंबुलगेकर यांनी शैक्षणिक समस्या, अडचणी व त्या वरील उपाय योजना याविषयी सविस्तर माहिती दिली .श्री ढवळे सरांनी देखील काही मद्दे विस्तृत पणे मांडले.  प्रशासकीय सूचना देऊन आपले मोजक्या शब्दात केंद्राचे केंद्रप्रमुख तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष नागोराव जाधव यांनी विचार मांडले. 


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलासे   प्रा. शा .दगडगाव  यांनी केले तर आभार प्रदर्शन कदम एच. एच . यांनी केले. शेवटी दगडगाव  या शाळेचे मु. अ. तथा शिक्षक यांच्यातर्फे उपस्थितांना सुरूची भोजनाची व्यवस्थेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सदर शिक्षण परिषदेस अंतर्गतचे मुख्याध्यापक व केंद्रांतर्गत शिक्षक - शिक्षिका हे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)