झपाटलेले लोकं क्रांती घडवून आणतात - उद्बोधन सत्रात डॉ. भटकर यांचे प्रतिपादन..

शालेयवृत्त सेवा
0

 



नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी गोपाल गावीत) :

जिल्हा परिषद कन्या शाळा रनाळे येथे निपुण भारत अभियान अंतर्गत शिक्षक व अंगणवाडी सेविका यांचे उद्बोधन सत्र आयोजित करण्यात आले होते. या सत्रात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदूरबारचे प्राचार्य डॉ.जगराम भटकर यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी उपस्थितांना निपुण भारत अभियान समजावून सांगितले व त्याच वेळी आजपर्यंत जे काही बदल घडले क्रांती झाली ती झपाटलेल्या लोकांनी केली आहे. त्यामूळे आपण पण सर्व झपाटून कामाला लागून या शैक्षणिक क्षेत्रात एक क्रांती घडवून आणण्यास सज्ज होऊ असे आवाहन यावेळी केले.


या उद्बोधन वर्गास रनाळे केंद्रातील शिक्षक व अंगणवाडी सेविका उपस्थीत होत्या. श्री. पंकज गोसावी, श्री. पवन निकम. श्रीम. उज्ज्वला पाटील. श्रीम. सोनाली शिंदे यांनी सूलभक म्हणून भूमिका पार पाडली. या सर्व सुलभकांनी निपुण भारत अभियान, त्याची पार्श्वभूमी, गरज, ध्येये, विद्याप्रवेश, पायाभूत साक्षरता भाषा व गणित विषय क्षेत्रे,NAS अहवाल अशा विविध विषयांवर उपस्थितांना माहिती दिली.


रनाळे केंद्रांचे केंद्र प्रमूख श्री वसंत पाटील यांनी शाळा व अंगणवाडी यांच्या समन्वयातून निपुण भारत अभियान यशस्वी करण्या बाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कन्या शाळेच्या विद्यार्थीनी यांनी उपस्थितांचे स्वागत स्वागत गीताने केले. विद्यार्थिनींच्या कृतियुक्त स्वागत गीताने प्रभावित होऊन प्राचार्य डॉ भटकर साहेब यांनी त्यांचे कौतुक केले व ५०१ रुपये बक्षीस म्हणून दिले. 


कार्यक्रमाच्या शेवटी निपुण भारतची प्रतिज्ञा घेण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मुख्याध्यापक अमृत पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कन्या शाळेचे मुख्याध्यापक श्री अमृत पाटील  व त्यांचे सहकारी श्रीम. उज्ज्वला पाटील, श्रीम. रेखा मुरकेवार, श्री. मंगेश वसावे यांनी प्रयत्न केले

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)