परिवर्धा केंद्र शाळेत येथे लोकमान्य टिळक व आन्नाभाऊ साठे जयंती निमित्त पुस्तके वाटप..

शालेयवृत्त सेवा
0

                   



नंदुरबार (शालेय वृत्तसेवा) :

लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त मानवसेवा हीच ईश्वरसेवा या ग्रुपचे प्रमुख आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट कमांडर, डाॅ.मनिलाल शिंपी यांच्या संकल्पनेनुसार दैनिक स्वराज्य संपादक डॉ.किशोर बळीराम पाटील आणि स्वामीनारायण ट्रस्टचे डॉ.दिनेश भाई ठक्कर यांच्या सहकार्याने डोंबिवली रोटरी क्लबचे सचिव किशोर आढळकर यांच्या वतीने व डॉ.किशोर अमोदकर परिवर्धा यांचा प्रमुख उपस्थितीत. गरजू व होतकरू मुलांना प्राथमिक इंग्लिश टीचर या पुस्तकाचे वाटप करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले.


यानंतर उपस्थित अतिथींचा सन्मान करण्यात आला. डॉ. मनिलाल  यांनी विद्यार्थींना मार्गदर्शन करताना सांगितले की याच शाळेच्या इमारतींमध्ये आम्ही बाराखडी आणि उजळणीचे पाठ गिरवले आणि आमच्या गुरुजनांनी आम्हाला आज खंबीर नेतृत्व करण्याची प्रेरणा दिली त्यामुळे याचे शाळेने मला खंबीर असे नेतृत्व करण्याची क्षमता प्रदान केली आहे असे प्रतिपादन केले. व आपल्या स्थानिक भाषेत गाणे गाऊन  विद्यार्थांना आपलेसे केले. मनिलाल शिंपी  हे केंद्र शाळा परिवर्धा येथील माजी विद्यार्थी आहेत आणि आपल्या शाळेप्रती  आपण काही देणे लागतो ही भावना मनात ठेवून आज शाळेतील सर्वच ९५ विद्यार्थींना हासुरे इंग्लिश प्रायमर हे पुस्तक वाटप  केले व शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त केली व अशिच सेवा करत राहणार असा शब्द दिला.


 तसेच डॉ. किशोर आमोदकर  यांनी ही विद्यार्थींना मार्गदर्शन केले तसेच डॉ. किशोर अमोदकर व परीवर्धे येथील रहिवाशी डॉ. मनिलाल शिंपी यांचा महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल भगतसिंग  कोष्यारी यांचा हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला शाळेतील मुख्याध्यापक सौ.शिंदे मॅडम व सर्व शिक्षक उपस्थित होते. 


कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जयवंत जोशी यांनी केले. व शाळेसाठी आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवण्याचे खरे पुण्य महाराष्ट्राचा १८ जिल्ह्यांमध्ये  मानवसेवा हीच ईश्वरसेवा या ग्रुप तर्फे खूप मोठं कार्य  सांभाळणारे शिंपी सरांचां खूप अभिमान वाटतो या शब्दात कौतुक शाळेतील सर्व शिक्षकांनी  केले. उपस्थित मान्यवरांचे देखील सौ.शिंदे मॅडम यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाला विशेष प्रेरणा होती ती शिक्षण विस्तार अधिकारी ममता पटेल व केंद्रप्रमुख एस. एन. चौधरी यांची यांनी कार्यक्रमाला दिशा दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)