जि.प.पार्डी शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा : शाळेतील पाच मुलींना हीरक पंख पुरस्कार प्राप्त

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईडस् यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय हीरक पंख चाचणी शिबीरात जि. प. पार्डी शाळेतील पाच मुलींनी सहभाग घेतला होता. सदरील परीक्षा राज्यस्तरीय असते व महाराष्ट्रातील निरनिराळ्या जिल्ह्यातील मुलींनी सहभाग नोंदवला होता दि. 10.10.2021ते 12.10.2021या तीन दिवसांच्या कालावधीत ऑनलाईन स्वरूपात झाली होती.  


बुलबुल प्रवेश घेतल्यानंतर तीन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर शिबीरात सहभाग घेता येतो. हा तीन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून पार्डी शाळेतील मुलींनी हीरख पंख चाचणी यशस्वी पूर्ण केली आहे. नुकतेच महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईडस् कार्यालयाकडून आलेल्या निकालात पार्डी शाळेतील  शिवाणी साबळे,नम्रता मदने,गुंजन मरकुंदे,ऋतुजा मरकुंदे,सिध्दी मरकुंदे या पाच मुलींची नावे आहेत. 


सदरील परीक्षेसाठी मार्गदर्शक म्हणून प्लाॅक लिडर तथा प्रगत प्रशिक्षण प्राप्त उषा नळगिरे यांनी काम पाहिले. विशेष सहकार्य शाळेचे मुख्याध्यापक राजेश देशमुख, सहशिक्षक नामदेव भोसले, रमेश पावडे, योगाजी कल्याणकर,शोभा देशमुख, मंगला सलामे यांचे लाभले. मुलींच्या या यशाबद्दल शाळा, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


 पार्डी शाळा गुणवत्तेबरोबर स्काऊटस् आणि गाईडस् चळवळीत सक्रिय सहभाग घेते अर्धापूर तालुक्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे मत गटशिक्षणाधिकारी रूस्तुम ससाणे यांनी गौरवोद्गार काढले याचबरोबर शिक्षणविस्ताराधिकारी गोडबोले,पार्डी शाळा नाविन्यपूर्ण उपक्रमात सदैव सहभागी राहते असे मत केंद्रप्रमुख विकास चव्हाण यांनी व्यक्त केले व अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)