शाळेच्या परिसरातील झाडांना राखी बांधून राखी पौर्णिमा उत्साहात साजरी..

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

मारतळा  11 ऑगस्ट दिनांक 2022 आज राखी पौर्णिमेनिमित्त शाळेला सुट्टी असली उपक्रमशील शिक्षक रवी ढगे यांनी मुलांशी व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून संवाद साधून राखी पौर्णिमेचे महत्त्व त्यांना समजावून सांगितले आपण सर्वांनी निसर्गाचे रक्षण करणं किती गरजेचं आहे या संदर्भात मार्गदर्शन केले असता त्यास प्रतिसाद म्हणून तरी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या वर्ग पाचवी ते सातवीच्या मुलांनी निसर्गाप्रती आपली भावना व्यक्त करत  मागील चार वर्षापासून शालेय परिसरातील झाडांना राखी पौर्णिमेच्या निमित्ताने राख्या बांधून अनोख्या पद्धतीने त्यांच्या प्रति कृतीज्ञता व्यक्त व्यक्त करत तू आम्हाला सावली दे आम्ही तुझी नेहमी काळजी घेऊ का असा संवाद झाडांसोबत मुलांनी साधला व परिसरातील सर्व झाडांना मुलं व मुलांनी राख्या बांधल्या. 


या सर्व झाडांमुळे शाळेच्या सौंदर्यात भर पडली आहे तसेच मागील वर्षीचा वृक्षमित्र फाउंडेशन नांदेड कडून हरित शाळा म्हणून पुरस्कार सुद्धा शाळेला प्राप्त झाला आहे वृक्षारोपण करणे हा उद्देश नसून लावलेले वृक्ष टिकवणे हा एक प्रामाणिक आमचा उद्देश असल्याचा विद्यार्थ्यांचे ध्येय असल्याचं त्यांच्या कृतीतून दिसून येत आहे. सदरील झाडांमुळे उन्हाळ्यात पक्ष्यांची सोय होत आहे केंद्र शाळा असल्यामुळे येणाऱ्या शिक्षकांना आपली गाडी लावण्यासाठी सावली मिळत आहे. 


सध्या सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने हर घर तिरंगा या या उपक्रमाच्या माध्यमातून शाळेचे उपक्रमशील शिक्षक रवी ढगे यांनी सर्व मुलांना भारताच्या सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून मिळणारे ऑनलाईन प्रमाणपत्र कसे प्राप्त करावे हे प्रत्यक्ष प्रमाणपत्र काढून त्यांना सांगितले व सर्व मुलांना काढून देत आह या उपक्रमात विशेष म्हणजे मुलं व मुली मोठ्या संख्येने सहभागी झाले असून सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी चैतन्या  ढेपे ,सोनाक्षी भोंग , नंदिनी ढगे ,श्रावणी येडे ,अक्षरा गजभारे ,माधुरी मेटकर माहीम पठाण ,साईप्रसाद वाघमारे, रुद्र बतलवाड, वैष्णव झिने, अभिजीत लांडगे आदी विद्यार्थी परिश्रम घेत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)