स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा परिषद लोणी शाळेत घेतली 'बालसभा' !

शालेयवृत्त सेवा
0

 




 नांदेड ( शालेय वृत्तसेवा):

स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा परिषद लोणी शाळेत 'बालसभा ' घेण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या सत्रात ' तिरंगा झेंडा ' या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली.



किनवटचे गटशिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने यांच्या आवहनानुसार ८ ऑगस्ट रोजी लोणी जिल्हा परिषद शाळेत बालसभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्ष म्हणून वर्ग सातवीची कुमारी तेजस्वी काळे ही होती तर कु. त्रिशा मेडलवार  काशिनाथ गुंजकर व सुरज सोळंके या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  



कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.श्रुती गुंजकर तर आभार कु.पूर्वी धुर्वे यांनी केले.  मुख्याध्यापिका वर्षा कुलकर्णी, शिक्षिका शाहीन बेग, विद्या श्रीमेवार आणि रमेश मुनेश्वर या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सभा संपन्न झाली. त्यानंतर दुसऱ्या सत्रात ' तिरंगा झेंडा ' या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.


विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देशभक्तीपर मुल्यांची रुजवणूक व्हावी. सभाधीटपणा असावा. यासाठी अशा बालसभेचे नितांत आवश्यकता आहे. 

- वर्षा कुलकर्णी ( मुख्याध्यापिका )

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)