भर पावसात दंडार व ढोल ताशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जि.प.शाळा गणेशपूर जुने येथे उत्साहात साजरा

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी संपूर्ण देशात अमृत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. किनवट तालुक्यातील जि.प.प्रा.शा.गणेशपूर जुने येथे ही त्याअनुषंगाने विविध उपक्रम राबवून कार्यक्रम यशस्वी करण्यात आला . गावातील सर्वच नागरीक भर पावसात ही उत्साहाने सहभागी झाले होते.


सर्वजण   प्रथम सुशोभित केलेल्या  शाळेत रांगोळी,पताके, तिनरंगीफुगे, तिरंगी झेंडे ,देश भक्ती गीताचा उत्सात मनी संचारून  गावातील लहान मोठी सर्व लोक जमा झाले. नेत्यांच्या प्रतीमांचे पुजन करून ध्वजारोहण करण्यात आले .त्यानंतर गावातून  प्रभात फेरी काढण्या साठी गावातील दंडार ढोल ताशे घेऊन भर पावसात ही नवयुवक सज्ज झाले .माजी सरपंच तुकाजी आत्राम, शा.व्य.स.अध्यक्ष विजय मेश्राम, जेष्ठ नागरिक चंपत आत्राम यांनी दंडार चे आयोजन केले होते.


गावातील सर्व युवक,युवती,महिला व पुरुषा सह विद्यार्थ्यां बरोबर रॅलीत सहभागी झाले होते प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातात  तिरंगी फुगे व तिरंगी झेंडे अगदी सुंदर अशी रॅली संपवून शाळेत विविध कार्यक्रमाला  विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गाऊन सुरूवात केली .अनेक विद्यार्थ्यांनी मराठी व इंग्लिश मध्ये भाषणे केली व मराठी हिंदी देश भक्ती गीते गायली .अमृत महोत्सवा निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले .चित्र रंगभरण स्पर्धा ,रांगोळी स्पर्धा,बालसभा,संगीत खुर्ची ,भाषणे व  देश भक्ती गीत गायन यांच्यात सर्वोत्कृष्ट अशा स्पर्धकांचे नंबर काढून बक्षीस वितरण करण्यात आले .


सूत्रसंचालन शाळेचे मु.अ.श्री प्रविण पिल्लेवार यांनी केले व शेवटी विद्यार्थ्यांचे पालक व गावातील नागरिकांना शाळेत तयार करण्यात आलेल्या रोप वाटीकेतील रोपांचे वाटप केले व विद्यार्थ्यांना बिस्कीट पुडे व चाॅकलेट देण्यात आले.  गावातील 100% घरावर तिरंगी झेंडे लावण्यात आले.गावातील युवकांचे नेहमी शाळेला सहकार्य असते त्यामुळे जि.प.प्रा.शाळागणेशपूर जुने कडून वाॅलीबाॅल व त्याची जाळी त्यांच शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे म्हणून भेट दिली . शेवटी उपस्थितीत सर्वाचे आभार सहशिक्षीका  उर्मिला परभणकर  यांनी  मानले व कार्यक्रम संपन्न झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)