अंबापुर जि.प.शाळेत रक्षाबंधन सण साजरा

शालेयवृत्त सेवा
0

 



नंदुरबार  (शालेय वृत्तसेवा ) :

नंदुरबार तालुक्यातील जि.प.शाळा अंबापुर येथे बहीण भावाच्या अतूट नात्याचा सण रक्षाबंधन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनसिंग चौरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून अंगणवाडी सेविका ,आशा वर्कर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले. 


शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनसिंग चौरे यांनी सरस्वती पूजन केले. शाळेतील शिक्षक भागवत धनगर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शिक्षक देविदास कोकणी सर यांनी रक्षाबंधनाचे महत्व जसे की भावाने बहिणीचे रक्षण करावे यासाठी हा धागा बहीण भावाच्या हातावर बांधते असे सांगून माहिती देण्यात आली. त्यानंतर विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राखी बांधली तसेच मुलांनी त्यांना भेटवस्तू देऊन रक्षण करण्याचे वचन दिले. सर्व विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करण्यात आली. 


शाळेतील शिक्षिका सपना हिरे यांनीही मनोगत व्यक्त करताना सांगितले की,आपला भारत देश हा धार्मिक संस्कृतीचा देश असून आपण अनेक सण मोठ्या उत्साहात पार पाडत असतो. असाच एक सण म्हणजे रक्षाबंधन हा सण नारळी पौर्णिमा या दिवशी साजरा करण्यात येतो रक्षाबंधन म्हणजे बहिण भावाच्या प्रेमाचे अतूट बंधन..हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस मानला जातो. या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे हृदय प्रेमाने जिंकून घेते. राखी म्हणजे बहिणीच्या रक्षणाचे वचन समजण्यात येते. राखी हा नुसता धागा नसून ते बहीण भावाच्या नात्याचे बंधन असते.


 रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधून तिच्या रक्षणाचे , तसेच अडी अडचणीच्या प्रसंगी बहिणीच्या सोबत खंबीर पने उभे राहण्याचे वचन घेत असते. बहीण भाऊ एकमेकांपासून कितीही लांब असले तरी या पवित्र सणाला बहीण राखी बांधायला आपल्या भाऊरायाकडे जातेच किंवा भाऊ स्वतः भाऊ हा स्वतः जाऊन आपल्या बहिणीच्या हातून राखी बांधून घेत असतो. असेही मत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाला शाळेतील मुख्याध्यापक रमेश पवार,शिक्षक दातक्या वळवी यांनी उपस्थांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)