अजेपूर येथे "जागतिक आदिवासी गौरव" दिवस साजरा..

शालेयवृत्त सेवा
0

 



नंदुरबार (शालेय वृत्तसेवा) :

 नंदुरबार तालुक्यातील जि.प.मराठी शाळा अजेपूर येथे "जागतिक आदिवासी गौरव" दिन व क्रांती दिन साजरा करण्यात आला. सर्वप्रथम शालेय प्रांगणात आवार स्वच्छता करून रांगोळी काढण्यात आली. ७५ वा स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी निमित्ताने गावात जनजागृती रॅली काढण्यात आली. 


हर घर तिरंगा व विश्व आदिवासी दिनाच्या घोषणा देण्यात आल्यात. त्यानंतर शालेय प्रांगणात कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे सहशिक्षक विशाल पाटील यांनी केले. उपसरपंच संजय चौरे, शा.व्य.समितीचे अध्यक्ष रतीलाल साबळे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून आदिवासी क्रांतिकारक यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमात इयत्ता २ री ते ४ थीच्या विद्यार्थ्यांनी मराठी व कोकणी भाषेत आदिवासी दिनाबद्दल मनोगते व्यक्त केलीत. 


आदिवासी परंपरेचे जतन व संवर्धन सर्वांनी करावे असे आवाहन करत "हर घर तिरंगा" उपक्रमाबद्दल माहिती शाळेचे मुख्याध्यापक निलेश धावडे यांनी केले. शाळेचे सहशिक्षक विशाल पाटील यांनी कोठली भाषेतील आदिवासी दिनाचे काव्य गायन करून दाखवले. तसेच कोकणी पेहराव केलेल्या विद्यार्थ्यांची वेशभूषा स्पर्धा राबविण्यात आली. ७५ वा स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी उपक्रमातील काल घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आलीत. 


शेवटी विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आदिवासी गीतांवर विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ यांनी नृत्य करून जल्लोष केला. या कार्यक्रमाला उपसरपंच संजय चौरे, शा.व्य.समिती अध्यक्ष रतीलाल साबळे, पोलीस पाटील अनिल पवार, किशोर पवार, रमेश देशमुख, मुन्ना पवार, शंकूतला ताई गवळी, कल्पना ताई गवळी, अंगणवाडी कर्मचारी ताईबाई चौरे, अनिताताई गावीत, लक्ष्मीताई चौरे, लाशीबाई चौरे, मुख्याध्यापक निलेश धावडे, शिक्षक विशाल पाटील, गावातील ग्रामस्थ व तरुण उपस्थित होते. उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)