जिल्हा परिषद हायस्कुल जवळगाव प्रशालेचे NMMS परीक्षेत अभूतपूर्व यश!

शालेयवृत्त सेवा
0



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

सन 2021-22 च्या दि.19 जून 2022 रोजी झालेल्या इयत्ता आठवीच्या NMMS परीक्षेत जि. प. हायस्कूल जवळगाव ता.हिमायतनगर जि.नांदेड मधील 10 विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होऊन घवघवीत यश संपादन केले आहे.


आश्लेषा अरविंद पवार,मनिषा राजेश गायकवाड,मुक्ताई गजानन गायकवाड,प्रतिज्ञा अशोकराव रावते,गायत्री बाबाराव कुंभेकर, कादंबरी संतोष बाकोटकर, निकिता तानाजीराव कदम, आरती भिमराव पवार,अंबिका संतोष पवार,सुमित माधव इंगोले हे विदयार्थी उत्तीर्ण झाले आहेत.


सर्व विद्यार्थ्यांना विषयशिक्षक श्री.कदम, श्री.गोवंदे,श्री.माळगे,श्री.चेपूरवार,श्री.पडगीलवार श्री.मुंडकर,श्रीमती कमळू,श्रीमती येरमवार,श्रीमती ढोकाडे, श्रीमती गुरुफळे,श्रीमती मुस्कावाड यांचे मार्गदर्शन लाभले.


यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक श्री.शिराळे डी.बी.,माजी मुख्याध्यापक श्री.झांबरे डी. एस.,शाळा व्यवस्थापन समिती,शिक्षक वृंद,पालक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)