उमरी बाजार केंद्रांची शिक्षण परिषद संपन्न..

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

किनवट तालुक्यातील जि.प.कें.प्रा.शा.उमरी बा.येथे  केंद्रस्तरीय शिक्षण परिषद नुकतीच घेण्यात आली. शिक्षण परिषदेसाठी  शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.वैशाली कोटरंगे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष जीवनजी कांबळे व सदस्य  मारोती गुरनुले  ग्रामपंचायत सदस्या सौ.अंजु मडावी उपस्थित होते.



शाळेचे मुख्याध्यापक यामावार एम.एम. यांनी सर्वांचे स्वागत केले. शिक्षण परिषदचे सुत्रसंचलन व प्रस्ताविक पदवीधर शिक्षक राजू वाघमारे सरांनी केले. या परिषदेचे तज्ञ मार्गदर्शक  शेख सर व कुसूमकर सर यांनी सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले.या   शिक्षण परिषेदेसाठी उमरी बाजार केंद्रांतर्गत सर्व शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)