जि.प.केंद्रशाळा प्रकाशा येथे शिक्षण परिषद संपन्न..

शालेयवृत्त सेवा
0

 



नंदुरबार ( शालेय वृत्तसेवा) :

शहादा तालुक्यातील प्रकाशा केंद्राची शिक्षण परिषद केंद्रशाळेत संपन्न झाली. नंदुरबार जिल्हा परिषद सदस्या सौ.भारतीताई भील यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण परिषद संपन्न झाली. यावेळी गटशिक्षणाधिकारी डी.टी.वळवी, मार्गदर्शन व प्रेरणा सुनील तावडे शिक्षण विस्तार अधिकारी, राजेंद्र धनगर केंद्रप्रमुख प्रकाशा, केंद्रीय मुख्याध्यापक रामलाल पारधी, सर्वोदय विद्यालयातील गुणवंत शिक्षक नरेंद्र गुरव, वैजाली शाळेचे पदोन्नती मुख्याध्यापक सुदाम पाटील, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक बंधू- भगिनी उपस्थित होते. 


जिल्हास्तरीय विषय मागील शिक्षण परिषद मागोवा. केंद्रप्रमुख राजेंद्र धनगर यांनी माहिती सांगितली. एन.ए.एस विश्लेषण केंद्रीय मुख्याध्यापक रामलाल पारधी यांनी माहिती दिली. मुलांच्या शिक्षणातील पालकांची भूमिका किशोर महाले मुख्याध्यापक बुपकरी मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान भाषा व गणित घटक संच विश्वास माळी मुख्याध्यापक डामरखेडा,उमेश विसपुते, बुपकरी यांनी माहिती दिली. विद्यांजली कार्यक्रम व विविध उपक्रमांचा आढावा व चर्चा डामरखेडा शाळेचे शिक्षक गोकुळ लोहार यांनी माहिती दिली. 


विद्यार्थी केंद्रातील शैक्षणिक गरजा तळोदा समन्वयक राहुल निफाडकर ग्यानप्रकाश फाउंडेशन बद्द्ल माहिती दिली. शिक्षण परिषदेस मार्गदर्शन करताना शिक्षण विस्तार अधिकारी सुनील तावडे यांनी गुणवंत विद्यार्थी घडवणे. शिक्षकांनी आपल्या कर्तव्य आणि जबाबदारी प्रती सजग असणे.शालेय पोषण आहार विविध शैक्षणिक विषयावर मार्गदर्शन केले. प्रशासकीय विषयांवर राजेंद्र धनगर यांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी नाविण्यपुर्ण उपक्रम राबवित असल्याबद्दल वैजाली शाळांचे अभिनंदन केले. 


शिक्षक गोपाल गावीत व भरत पावरा व वैजाली शाळेचे मुख्याध्यापक सुदाम पाटील शिक्षक वृंदाचे अभिनंदन केले. सूत्रसंचालन रामलाल पारधी यांनी केले तर आभार प्रदर्शन गुणवंत शिक्षक दर्पण भामरे सरांनी उपस्थित मान्यवरांचे व सर्व शिक्षकांचे आभार व्यक्त केले. शिक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी केंद्रशाळेतील मुख्याध्यापक रामलाल पारधी सर, दर्पण भामरे सर, संगीता राणे, अनिता पाटील यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)