निळा जिल्हा परिषद शाळेत हर घर तीरंगा रॅली उत्साहात.. गटविकास अधिकाऱ्यांनी दिली भेट

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त दिनांक 12 ऑगस्ट 2022 रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा निळा येथे काढण्यात आलेल्या प्रभात फेरीस मा.गटविकास अधिकारी श्री मुक्कावार साहेबांनी भेट दिली.

यावेळी व्यसनमुक्ती संकल्प करण्यात आला.

1)तंबाखूमुक्त जीवन संकल्प

2)व्यसनमुक्ती संकल्प

3)अमली पदार्थ मुख्य संकल्प

या तीन ही प्रतिज्ञा घेण्यात आल्या.


त्या नंतर शाळेच्या प्रांगणात भारतीय माता,डॉ.बाबासाहडब आंबेडकर यांच्या वेशभूशेत काही विदयार्थी आले होते.. मुलांनी हातात तिरंगा घेऊन 75 हा अमृत महोत्सवी आकडा मुलांनी रेखाटला.. या सोहळ्यात.. सरपंच रोहित हिंगोले, व्यवस्थापण समिती अध्यक्ष शिवाजीराव जोगदंड, किशन जोगदंड, मोहन जोगदंड, प्रल्हाद जोगदंड, कंटेश जोगदंड, सर्व शिक्षक आणि शिक्षिका, ग्रामपंचायत चे ग्राम विकास अधिकारी वाघमारे साहेब आणि इतर पालक सहभागी होते.


 गावातील प्रमुख रस्त्याने "हर घर तिरंगा" या अभियानाची जनजागृती रॅली काढण्यात आला.  त्या रॅलीत नांदेड पंचायत समिती चे गटविकास अधिकारी श्री मुक्कावार साहेब,विस्तार अधिकारी जीवन कांबळे साहेब, यांनी सहभाग घेतला.

         

आदरणीय गटविकास अधिकारी श्री मुक्कावार सहडब यांनी शाळेतील विध्यार्थ्यांशी संवाद साधला.राष्ट्रीय ध्वज केव्हा फडकायचा,कुणी फडकायचा,आणि केव्हा उतरायचा याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. शालेय परिसर,आणि विध्यर्थ्यांचे मा.बी.डी.ओ. साहेब यांनी स्तुती केली.  मुख्याध्यापक श्री चोंडे सर यांनी गटविकास अधिकारी साहेब आणि जीवन कांबळे साहेब यांचा शाळेच्या वतीने सन्मान केला.तर आभारप्रदर्शन श्री पोहरे सर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)