खडकी (बा ) च्या जिल्हा परिषद शाळेच्या १२ विद्यार्थ्यांनी एनएमएमएस परिक्षेत मिळविले यश ! NMMS Exam

शालेयवृत्त सेवा
0

 






नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

केंद्र शासनाच्यावतीने आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी संधी मिळावी, या उद्देशाने ‘एनएमएमएस’ शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. या परीक्षेचा निकाला ११ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आला. या परीक्षेमध्ये हिमायतनगर तालुक्यातील जि.प.कें.प्रा.शा.खडकीचे  १५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १२ विद्यार्थ्यांनी यश मिळविले.  


प्रणाली हनवते हिने ११५ गुण मिळवित पहिला क्रमांक पटकावला, निकिता शिरगिरे हिने ११४ गुण मिळवित द्वितीय क्रमांक मिळविला, जान्हवी मोरे हिने १०९ गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला ‌.इतर उत्तीर्ण विद्यार्थी परमेश्वर ताटिकोंडलवार, ममता नारखेडे,समर्थ फुलके, संजिवनी फुलके,गायत्री जांभळे,महेक पठाण,छाया हनवते, सृष्टी हनवते,गजानन कलाले आदी विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 


ज्या पालकांचे उत्पन्न दीड लाख रुपयांच्या आत आहे, अशा सर्व आठवीच्या विद्यार्थ्यांना ‘एनएमएमएस’ परीक्षा देता येते. एनएमएमएस परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांला आठवी ते बारावीपर्यंत वर्षाला १२ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.या विद्यार्थ्यांना श्री.जाधव सर व पठाण सरांचे मार्गदर्शन लाभले.


शाळेचे मुख्याध्यापक श्री भुतनर सर, तसेच अध्यापक रायवार सर, इंगळे सर,राचुरे सर,जाधव सर, नागरगोजे सर, श्रीमती माळी मॅडम आदिंनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.तसेच शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत खडकी तर्फे विद्यार्थ्यांचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)