राष्ट्रीय पातळीवरील चित्रकला स्पर्धेत वाजेगाव येथील विद्यार्थ्यांचा सहभाग

शालेयवृत्त सेवा
0

 



पोलीस अधीक्षक धरमसिंग चव्हाण यांच्या हस्ते डाॕ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनच्या प्रमाणपत्रांचे वितरण ।


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

जि.प.कें.प्राथमिक शाळा वाजेगाव येथील उपक्रमशील शिक्षिका रूपाली गोजवडकर  यांच्या संकल्पनेतून दिवंगत माजी राष्ट्रपती भारतरत्न डाॕ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या सातव्या स्मृतीदिनानिमित्त  राष्ट्रीय पातळीवरील चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. 


या चित्रकला स्पर्धेत जि.प.कें.प्रा.शाळा वाजेगाव येथील मराठी व उर्दू माध्यमातील इयत्ता पाचवी ते आठवीतील एकूण 72 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन, डाॕ.एपीजे कलाम- महान शिक्षक, डाॕ.कलाम-मिसाईल मॕन व व्हिजन- 2020 या विषयावर आधारित चित्रे रेखाटली.स्पर्धेत  सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना डाॕ.एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन हाऊस आॕफ कलाम रामेश्वरम कडून प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले आहे.


अक्षर परिवार नावाने जिल्ह्यातील शैक्षणिक वर्तुळात सुपरिचित असणा-या वाजेगाव बीटमध्ये शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांच्या प्रेरणेने विविध शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येतात. विविध उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणाऱ्या उपक्रमशील शिक्षिका रूपाली गोजवडकर यांनी यापूर्वी विज्ञान प्रदर्शन, वाचन उपक्रम, विविध स्पर्धांचे आयोजन, विद्यार्थी हस्तलिखित निर्मिती, स्वनिर्मित स्वाध्यायपुस्तिका वाटप अशा विविध उपक्रमांद्वारे शालेय गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले आहेत. 


         चित्रकला स्पर्धा यशस्वी करण्यासाठी धम्मदिना सोनकांबळे, मुक्ता गोरगिळे, सादिया अंजूम, युसुफखान या शिक्षकांनी परिश्रम घेतले. यशस्वी विद्यार्थ्यांचे केंद्रप्रमुख रामेश्वर आळंदे, मुख्याध्यापक बाबुराव जाधव यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)