जिल्हांतर्गत बदल्यांची शक्यता वाढली.. | Transfer within District

शालेयवृत्त सेवा
0



आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना पाच सप्टेंबर पूर्वी भारमुक्त/कार्यमुक्त करण्याचे पत्र निर्गमित



सन २०२२ या वर्षात आंतरजिल्हा बदली झालेल्या जिल्हा परिषद शिक्षकांना कार्यमुक्त करणेबाबत पत्र नुकतेच निघाले आहेत.


जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्याबाबतचे सुधारित धोरण उपरोक्त संदर्भ क्र.१ येथील दिनांक ०७.०४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आले आहे. सदर धोरणातील तरतूदीनुसार सन २०२२ मध्ये राज्यातील एकूण ३९४३ जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या संगणकीय प्रणालीद्वारे दिनांक २२.८.२०२२ रोजी झालेल्या आहेत.


तसेच आता जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतची कार्यवाही सुरु करणे आवश्यक आहे. याकरिता आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त केल्यानंतरच रिक्त पदांची माहिती संगणकीय प्रणालीमध्ये अद्यावत करता येणार आहे.


सदरच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना जिल्हा परिषद, पुणे यांनी दिनांक ७.४.२०२१ च्या शासन निर्णयानुसार आवश्यक त्या कागदपत्रांची तपासणी तालुका स्तरावर करुन कार्यमुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणेच आपल्या जिल्हा परिषदेतील आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना दिनांक ५.९.२०२२ पर्यत कार्यमुक्त करण्याबाबतची कार्यवाही आपल्या स्तरावरुन करण्यात यावीत.


तथापि, कार्यमुक्त करण्याची कार्यवाही करताना प्रचलित धोरणानुसार १० टक्के पेक्षा अधिक पदे रिक्त राहणार नाहीत, याची कृपया दक्षता घ्यावी. गदिन ( का. गो. वळवी ) उप सचिव, महाराष्ट्र शासन. यांनी आदेश निर्गमीत केले आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)