स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत "हर घर तिरंगा"

शालेयवृत्त सेवा
0

 



मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा हा उपक्रम व्यापक प्रमाणात राबविण्याच्या सूचना केंद्र शासनाने दिलेल्या आहेत. त्यानुसार दि. १३ ऑगस्ट २०२२ ते दि. १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या घरावर तसेच सर्व शासकीय/ निमशासकीय/खाजगी आस्थापना/सहकारी संस्था यांच्या कार्यालयावर राष्ट्रध्वजाची उभारणी करण्याबाबतचा उपक्रम यशस्वीपणे राबवायचा आहे. त्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या दि. २० जून२०२२ च्या परिपत्रकाद्वारे सविस्तर मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.


हर घर तिरंगा व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत ११ ऑगस्ट २०२२ रोजी राज्यातील सर्व शाळांमध्ये प्रभातफेरी काढण्यात यावी. प्रभातफेरीमध्ये राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात यावे अशा सुचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत. 


शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या आधिपत्याखालील सर्व कार्यालयांनी हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची स्पष्ट छायाचित्रे, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या https:mahaamrut.org संकेत स्थळावर शालेय शिक्षण विभागाला दिलेल्या Login-GD1032 व पासवर्ड GDS##67 च्या सहायाने अपलोड करावी.

प्रभातफेरी / अमृतमहोत्सवाच्या अंमलबजावणीलागणारे साहित्य (उदा. पोस्टर्स, बेनर, जिंगल) हे पर्यटन विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यांचा वापर करावा.


जिल्हानिहाय हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाचे स्पष्ट फोटोग्राफ/ चित्रफीत/व्हिडीओ पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या संकेत स्थळावर शालेय शिक्षण विभागाला दिलेल्या उपरोक्त पासवर्ड चा उपयोग करून अपलोड करावे अशी माहिती दिली आहे. 


डॉ. नेहा बेलसरे उपसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी परीपत्रक काढले आहे. सदर कार्यक्रम अंमलबजावणीच्या सूचना प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक), जिल्हा परिषद, शिक्षण निरीक्षक (पश्चिम, दक्षिण, उत्तर)प्रशासन अधिकारी (मनपा) सर्व यांना देण्यात आल्या आहेत. 


या परीपत्रकानुसार शाळांनी आप आपल्या शाळांमध्ये विविध स्पर्धा, प्रभात फेरी यांचे आयोजन केले आहे. कोव्हीड 19 नंतर सुरु झालेल्या या नव्या शैक्षणिक वर्षात आँगस्ट महिन्यात अनेक सुट्या व कार्यक्रमाची रेलचेल व मुसळधार पाऊस यामुळे विद्यार्थांच्या उत्साहाबरोबरच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभर साजरा करण्यात येत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)