नंदुरबार (गोपाल गावीत) :
नंदुरबार तालुका विधायक समितीच्या वैभव विद्यालय वैजाली येथे ग्रामपंचायत वैजाली अंतर्गत वैभव विद्यालयाचे मुख्याध्यापक दिपक माळी यांच्या मार्गदर्शनाखाली गावात जनजागृती रॅली व पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते.
पथनाट्य कार्यक्रम प्रसंगी वैजाली गावाचे माजी सरपंच विनोद पाटील, ग्रामसेवक जितेंद्र चव्हाण, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुदाम पाटील, सर्व शिक्षक वृंद, बुंदलेश्वर आश्रम शाळेचे मुख्याध्यापक अनिल चव्हाण, सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी पालक व ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. लेझीमच्या तालावर नाचत ढोल ताशा सह संपूर्ण गावात हर घर तिरंगा रॅली काढण्यात आली.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर केली. सदर पथनाट्याचे सर्वांनी कौतुक केले. पंचक्रोशीतील गावांमध्ये हर घर तिरंगा पथनाट्याचे ५० प्रयोग सादर करण्याचा मानस केला आहे. हर घर तिरंगा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातून ७५ विद्यार्थ्यांचा एक गट तयार करण्यात आला आहे. हा गट पंचक्रोशीतील गावात १३ तारखेपासून १५ तारखेपर्यंत स्वयंसेवक म्हणून काम पाहणार आहे.विद्यार्थांनी घोषणा देण्यात आल्या. प्रत्येक घरावर तिरंगा लावणे तिरंगा उतरवणे अशी जबाबदारी या स्वयंसेवकांनी घेतली आहे.
सदर प्रयोगांची पूर्वतयारी शशिकांत शिंपी व प्रशांत पाटील यांनी विद्यार्थ्यांकडून करून घेतली .या कामी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.शिक्षक रामप्रसाद पाटील ,मधुकर पाटील, अफसर शेख ,अशोक पाटील, अंबर परदेशी सोनाली जैस्वाल, संगीता पाटील, शितल मोरे, योगेश निकम, रमेश पवार, विनोद पाटील, गणेश पाटील, चंदु पाटील आदीने परिश्रम घेतले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .