नांदेड (शालेय वृत्तसेवा):
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथीनिमित्त आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जवळ्यात चिमुकल्यांनी अभिवादन केले. लो. टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पुष्प आणि धूप पूजन केले.
यावेळी मुख्याध्यापक ढवळे जी. एस., शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर, संतोष घटकार, ग्राम पंचायत सदस्य शंकर गच्चे, पांडूरंग गच्चे, संजय कांबळे, हरिदास पांचाळ, हैदर शेख आदींची उपस्थिती होती.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथीनिमित्त आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जवळ्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत अभिवादनाचा संयुक्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शिक्षक नेते संतोष अंबुलगेकर यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
त्यानंतर बालसभा घेण्यात आली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी समयोचित मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सर्व नियोजन विद्यार्थी बालसभा समितीने केले होते.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .