हे ॲप्स आपल्या फोनमध्ये नाहीत ना..|Make sure these apps are not in your phone.

शालेयवृत्त सेवा
0

 



गुगल आपल्या अँड्रॉइड सिस्टमला अधिकाधिक सुरक्षित करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते. परंतु तरीदेखील असे काही ॲप्स गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध असतात जे वापरकर्त्यांची माहिती चोरतात किंवा त्यांच्या मोबाईल फोन मध्ये फेरफार करतात .हे ॲप्स अशा पद्धतीने बनविलेले असतात की सामान्य वापरकर्त्यांना ते नेमके आपल्या फोनमध्ये काय काय बदल करतात ते माहित देखील होत नाहीत .बऱ्याच वेळा हे ॲप्स आपला डेटा चोरतात ,आपल्याला अनावश्यक नोटिफिकेशन्स पाठवितात , इतर ॲप्सच्या नोटिफिकेशन ला ब्लॉक करतात, तिसराच एखादा ॲप जाणीवपूर्वक इन्स्टॉल करतात .त्यामुळे आपली गोपनियता आणि सुरक्षितता धोक्यात येते.


नुकतेच गुगलने अशा काही ॲप्सना आपल्या प्ले स्टोअर वरून  काढून टाकले आहेत. एका बातमीनुसार हे ॲप्स वापरकर्त्यांना वारंवार नोटिफिकेशन पाठविणे त्यांची माहिती गोळा करणे ,त्यांच्या नकळत त्यांच्या मोबाईल मध्ये फेरफार करणे असे प्रकार करत होते. गुगलने जरी प्लेस्टोर वरून हे ॲप्स काढून टाकले  तरीदेखील बऱ्याच वापरकर्त्यांच्या फोनमध्ये हे ॲप्स असू शकतात म्हणून वापरकर्त्यांनी आपल्या फोनमध्ये हे ॲप्स नाहीत याची खात्री करणे आवश्यक आहे. चला पाहूया गुगलने कोणकोणत्या ॲप्स ना आपल्या प्लेस्टोरवरून काढून टाकले आहेत ते..


Junk Cleaner


EasyCleaner


Power Doctor


Super Clean


Full Clean


Fingertip Cleaner


Quick Cleaner


Keep Clean


Windy Clean


Carpet Clean


Cool Clean


Strong Clean


Meteor Clean


आपल्या फोनमध्ये देखील हे अँप्स असतील तर लगेच हे ॲप्स अनइन्स्टॉल करा आणि आपला गुगलचा पासवर्ड सुद्धा बदलून घ्या.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)