नंदूरबार ( शालेय वृत्तसेवा) :
अध्यापक शिक्षण मंडळद्वरा संचालित,कला व वाणिज्य कॉलेज ट्रस्टचे,आप्पासाहेब गिरधर एकनाथ माळी कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळोदा, ता.तळोदा जि. नंदुरबार येथे आजादी का अमृत महोत्सव" हर घर तिरंगा" या उपक्रमांतर्गत कनिष्ठ महाविद्यालयातील संस्कृतीक समिती व राष्ट्रीय सेवा योजना एककाद्वारे देशभक्तीपर चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, वृक्षारोपण हे कार्यक्रम घेण्यात आले.
तसेच मानवी साखळी करून 75 वा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला यावेळी "हर घर तिरंगा" उपक्रमानिमित्त तळोदा शहरात जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा देऊन जनजागृती केली. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री.बी.बी.हुंबरे, पर्यवेक्षक श्री. के. आर. पदमर आणि सर्व प्राध्यापकांनी तळोदा शहरातील हुतात्मा स्मारकाला वंदन करून स्वातंत्र्य सेनानींना अभिवादन केले.
यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस. एन. शर्मा यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत "हर घर तिरंगा" या उपक्रमाविषयी माहिती देऊन रॅलीची सांगता केली. याप्रसंगी श्री. सेगा तडवी, श्रीमती उषा पावरा, सांस्कृतिक समिती प्रमुख श्रीमती प्रभावती वसावे, श्रीमती. सुवर्णा गिरासे, श्री.हेमंत चौधरी, श्री.छोटू ठाकरे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी श्री. नितीन मगरे श्रीमती. ज्योती मगरे श्री.संगम यशोद , श्री.जयेश मगरे , श्री.निषाद माळी, श्रीमती. पूजा जैन यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .