नंदुरबार ( शालेय वृत्तसेवा ) :
अ. शि. मंडळद्वारा संचालित, आप्पासाहेब गिरधर एकनाथ माळी कनिष्ठ महाविद्यालय तळोदा, तालुका- तळोदा येथे राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 1ऑगस्ट 2022 रोजी लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात.
आली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. बी. बी. हुंबरे होते , कार्यक्रमाला पर्यवेक्षक श्री.के.आर. पदमर, वरिष्ठ प्राध्यापक श्री.एस. के. तडवी,श्रीमती यु. टी. पावरा उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती एस.डी. गिरासे यांनी केले, प्रास्ताविक श्री.हेमंत चौधरी यांनी केले यावेळी प्रमुख वक्ते म्हणून इतिहास विभाग प्रमुख श्रीमती. प्रभावती वसावे यांनी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. बी. बी. हुुंबरे यांनी अध्यक्षीय मनोगततून लोकमान्य टिळक व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या कार्या विषयी माहिती दिली आभारप्रदर्शन श्री.संगम यशोद यांनी केले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. छोटू ठाकरे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी श्री. नितीन मगरे, श्री. जयेश मगरे, श्रीमती ज्योती मगरे श्रीमती सुषमा टवाळे श्रीमती पूजा जैन,श्री. पितांबर वळवी श्री. निषाद माळी यांनी परिश्रम घेतले
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .